Sugar Production agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : साखर कारखान्यांचा निम्मा हंगाम संपला, गाळपात पुणे तर साखरनिर्मीतीत कोल्हापूरची आघाडी

Sugar production Kolhapur : ऊस गाळपात पुणे विभागाने बाजी मारली असून, साखरनिर्मितीत अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर विभाग अव्वल ठरला आहे.

sandeep Shirguppe

Pune Kolhapur Sugar Production : महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झाले. दरम्यान मागच्या दोन महिन्यात राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त उसाचे गाळप पूर्ण केले आहे. आतापर्यंत ४ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ४१.८६ लाख टन साखरनिर्मिती करण्यात आली आहे. एकरी उत्पन्न वाढत असल्याने अंदाजापेक्षा साखरनिर्मिती अधिक होत आहे.

मात्र, साखरेचा उतारा सरासरी नऊ टक्क्यांवर अडकला आहे. गाळपात पुणे विभागाने बाजी मारली असून, साखरनिर्मितीत अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर विभाग अव्वल ठरला आहे. राज्यात सुरू असलेल्या हंगामात ९७ सहकारी तर १०० खासगी कारखाने गाळप करत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला ऊसटंचाई जाणविण्याचा तसेच ७५ ते ८० लाख टनांपर्यंत साखरनिर्मिती होण्याचा अंदाज होता.

मात्र, आता उसाच्या एकरी उत्पादनात काहीशी वाढ झाली असल्याने सुधारित अंदाज नव्वद लाख टन साखरनिर्मितीपर्यंत गेला आहे. आतापर्यंत दोन महिन्यांत चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त साखरनिर्मिती झाली आहे.

तुलनेने चांगला साखर उतारा मिळाल्याने कोल्हापूर विभागाने ९८ लाख टन उसाचे गाळप करत दहा लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागाने ९.२८ टक्के साखरउतारा प्राप्त केल्याने १०४ लाख टन उसाचे गाळप करून साडेनऊ लाख टन साखरनिर्मिती केली आहे.

सोलापूर विभागनेही ८.३ लाख टनांपर्यंत मजल मारली आहे. उताऱ्यात कोल्हापूर, पुणे, नांदेड हे विभाग तुलनेने बरे आहेत. मागील हंगामात आतापर्यंतचा राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४२ टक्के होता. सध्याच्या हंगामात राज्यातील ९७ सहकारी साखर कारखान्यांचा साखरउतारा ९.५३ टक्के तर १०० खासगी कारखान्यांचा साखरउतारा ८.५२ टक्के आहे.

यामुळे या हंगामाचा सरासरी साखर उतारा ०.३८ टक्क्यांनी घटला असून, तो नऊ टक्क्यांवर रेंगाळला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित काहीसे बिघडणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या 'एफआरपी' वरही परिणाम होणार आहे.

साखरेचा भाव वाढला पाहिजे तरच लाभ...

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हंगाम लांबणीवर गेला याचा फारसा काही फरक पडला नाही. जिल्ह्यातील साखर कारखाने उशिरा सुरू झाल्याने काही प्रमाणात कर्नाटकात ऊस गेला असेल याचा काही अंशी फरक पडला. शासनाने २०१९ साली जो साखरेचा एमएसपी वाढवली आहे ती वाढवावी यामुळे कारखानदारांना याचा फायदा होईल.

एफआरपीच्या जोडीला साखरेचा भाव वाढल्यास याचा सर्वांना लाभ होऊ शकतो. याचबरोबर यंदा दुष्काळाची स्थिती असल्याने उसाच्या उताऱ्यात घट होईल अशी स्थिती होती परंतु आतापर्यंत कोणतीही घट होताना दिसून आली नाही. पुढे खोडवा तोडणीवेळी काही हे प्रमाण दिसेल का हे पहावे लागेल असे साखर तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT