Hailstorm  Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Update : कारंजा तालुक्यात गारपीट

Unseasonal Rain : तालुक्यातील नागाझरी येथे शनिवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास वीस ते पंचवीस मिनिटे गारपीट झाली.

Team Agrowon

Wardha News : तालुक्यातील नागाझरी येथे शनिवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास वीस ते पंचवीस मिनिटे गारपीट झाली. गारांचा आकार आवळ्याऐवढा होता. त्यामुळे अतोनात नुकसान झाले. इतरही गावात गारपिटीसह पाऊस झाला.

यामुळे संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे.

नुकसानीची भरपाई मिळावी, याकरता आदेश काढावे, अशी मागणी सरपंच रमेश लोहकरे नागाझरी यांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

या नुकसानीचे विलंबाने पंचनामे झाल्यानंतर स्थानिक यंत्रणेकडून शासनाला अंतिम अहवाल सादर करण्यात आला होता. त्याची नुकसानभरपाई मिळायचीच असताना कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

यात तालुक्यातील नागाझरी येथील संत्रा बागायतदारांसह पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सलग दुसऱ्या महिन्यातही नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर दरात वाढ, आले आवकेत घट, बटाटा दरात घसरण, भेंडी दरात नरमाई तर मेथीचे भाव टिकून

Sericulture Award 2026: ‘उत्कृष्ट रेशीम उद्योग घटक’ पुरस्कारासाठी गिते दाम्पत्याची निवड!

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना २५ हजार अनुदान; सदस्य, कार्यक्रम संख्येच्या निकषांत बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Rainfall Deficit: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० मंडलांत पावसाचा खंड

Crop Stress: पावसाची मोठी उघडीप? पिकाचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT