Pune News : नागपूरसह परिसरात उष्म्यात वाढ झाल्याने पाऊसाची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान शनिवारी (ता.१६) विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीने परिसराला झोडपून काढले. यामुळे शहराच्या काही भागात झाडे उन्मळून पडली. तसेच घरात पाणी शिरने लोकांची एकच तारांबळ उडालेली होती. यातच आता हवामान विभागाकडून नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून गरज नसताना घराबाहेर पडून नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
शनिवारी (ता.१६) सायंकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या देवगिरीसह काही भागात झाडे उन्मळून पडली. तर काही भागांतील घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची ताराबंळ उडालेली होती. यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
वादळी वाऱ्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरीसह रिझर्व्ह बँके जवळ, सुगतनगर, अशोकनगरसह शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासह वीजपुरवठाही खंडित झाला होता.
हवामान विभागाचा अलर्ट
हवामान विभागाकडून १८ आणि १९ मार्च रोजी नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.