Market Bulletin: तूर दरात वाढराज्यातील अमरावती बाजारात तुरीची आवक कालच्या तुलनेत ७९२ क्विंटलने वाढून आज २ हजार ६४६ क्विंटल झाली होती. सरासरी दरात १५३ रुपयांची वाढ होऊन आजचा दर ८ हजार ८२८ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तर, अकोला बाजारात तुरीची आवक ११५ क्विंटलने घटून ७५६ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात १८५ रुपयांची वाढ होऊन आजचा दर ८ हजार ६८५ रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, लातूर बाजारात तुरीची आवक ३१० क्विंटलने घटून २२७ क्विंटल झाली होती. सरासरी दरात १९० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ८ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला..आले आवकेत घटआज अकोला बाजारात आल्याची आवक सोमवारच्या तुलनेत २०५ क्विंटलने घटून आज ९५ क्विंटल पाहायला मिळाली. तसेच, सरासरी दर १० हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तर, अमरावती बाजारात आल्याची आवक ७८ क्विंटलवर कायम होती. मात्र सरासरी दरात १ हजार रुपयांची घसरण होऊन आजचा दर १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर आला होता. तसेच, श्रीरामपूर बाजारात आल्याची आवक किंचीत वाढून आज २७ क्विंटल झाली होती. सरासरी दर ७ हजार रुपये प्रति क्विंटलवर कायम होता..Sugar Sale Quota: साखर कोटा दुसऱ्या पंधरवड्यासाठी १३.५० लाख टन.बटाटा दरात घसरणराज्यातील खेड-चाकण बाजारात बटाट्याची आवक कालच्या तुलनेत १ हजार ४५० क्विंटलने वाढून आज १ हजार ५०० क्विंटल झाली होती. सरासरी दरात १५० रुपयांची घसरण होऊन आजचा दर १ हजार १०० रुपये प्रति क्विंटलवर आला. तर, अकोला बाजारात बटाट्याची आवक १६० क्विंटलने वाढून १ हजार १५० क्विंटल झाली, तर सरासरी दर ९०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तसेच, छत्रपती संभाजीनगर बाजारात बटाट्याची आवक काही प्रमाणात वाढून आज १ हजार ५० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दरात १५० रुपयांची घसरण होऊन आजचा दर ७५० रुपये प्रति क्विंटल होता..Bharit Brinjal Market: जळगावच्या भरीत वांग्यांची आवक सुरू.भेंडी दरात नरमाईखेड-चाकण बाजारात भेंडीची आवक कालच्या तुलनेत ९३ क्विंटलने वाढून आज १०८ क्विंटल झाली होती. सरासरी दरात ५०० रुपयांची घसरण होऊन आजचा दर १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर आला होता. तर, अमरावती बाजारात भेंडीची आवक कालइतकीच आजही ६९ क्विंटलवर स्थिर होती. मात्र सरासरी दरात २५० रुपयांची वाढ होऊन आजचा दर १ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तसेच, छत्रपती संभाजीनगर बाजारात भेंडीची आवक किंचीत वाढून आज ५९ क्विंटल झाली होती. सरासरी दरात १५० रुपयांची घसरण होऊन आजचा दर ९०० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला..मेथीचे भाव टिकूनआज खेड-चाकण बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत ४ हजार ८० नगांनी वाढून आज १४ हजार ७८० नग झाली होती. सरासरी दर १० रुपये हजार प्रति नगावर स्थिर होता. छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथीची आवक १ हजार ६०० नगांनी वाढून १३ हजार नग झाली, तर सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ८ रुपये ५० पैसे प्रति नगावर पोहोचला होता. तसेच, अकलुज बाजारात मेथीची आवक काही प्रमाणात वाढून २ हजार ८०० नग झाली होती. सरासरी दरात ४ रुपयांची वाढ होऊन आजचा दर १३ रुपये प्रति नग होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.