Orange Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop Damage: गारपिटीमुळे संत्रापट्ट्यात नुकसान

Amravati Hailstorm: अमरावती जिल्ह्यात सोमवारी (५ मे) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांवरील फळे आणि पाने मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने आंबिया बहारातील उत्पादन धोक्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: तापमानातील वाढीमुळे संत्रापट्ट्यातील शेतकरी फळगळतीचा सामना करीत असतानाच सोमवारी (ता.५) सायंकाळी अनेक भागांत झालेल्या गारपिटीमुळे झाडावरील फळांची मोठी गळ झाली. त्याची दखल घेत शासनाने भरपाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

पूर्व विदर्भात वादळी वारा, गारपीट, पाऊस अशा नैसर्गिक आव्हानांचा सामना शेतकरी करीत आहे. गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत गारपीट सुरू असल्याने धान उत्पादकांचे नुकसान झाले. उन्हाळी धान सध्या अनेक भागांत काढणीच्या अवस्थेत आहे.

त्यांचे या पावसाने नुकसान झाले. त्यानंतर सोमवारी (ता.५) पश्चिम विदर्भातील संत्रापट्ट्यात झालेल्या गारपिटीने संत्रा बागायतदारांना मोठा फटका बसला. चांदूरबाजार, अचलपूर हे तालुके गारपिटीने सर्वाधिक प्रभावीत झाले. आंबिया बहारातील फळे सध्या झाडावर आहेत. आवळ्याच्या आकाराच्या या फळांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली. यापूर्वी तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने फळगळतीच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते.

त्यातच सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने अनेकांच्या बागांमधील झाडावर फळेच शिल्लक उरली नाही. घाटलाडकी, शिरसगाव कसबा, काजळी, ब्राह्मणवाडा, या भागांत गारपिटीची नोंद झाली. संत्रा झाडावरील पानांच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे काम होते. गारपिटीने पानगळही देखील झाली.

परिणामी झाडाचे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे कामही प्रभावित झाल्याने त्याचाही फटका बसला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंबिया बहारातील संत्रा फळांची उपलब्धता अत्यल्प राहण्याची शक्‍यता आहे. शासनाने देखील याची दखल घेत सर्वेक्षण व पंचनाम्याअंती भरपाईसाठी पुढे यावे, अशी मागणी देखील संत्रापट्ट्यातून होत आहे.

वाहतूक कोंडी

भंडारा जिल्ह्यात देखील पावसाचा तडाखा बसला. दरम्यान, वीज कोसळून कवडसी गावात दोन म्हशी ठार झाल्या. त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद, दारव्हा या भागांतही पावसाने दाणादाण उडाली. अनेक रस्त्यांवर वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

सोमवारी (ता.५) सायंकाळी संत्रापट्ट्यात गारपीट झल्याने लहान आकाराची संत्रा फळे आणि झाडावरील पाने प्रभावित झाली आहेत. मोठ्या प्रमाणावर फळगळ झाल्याने आंबिया हंगाम हातातून गेला आहे. कांदा उत्पादकांनाही याचा फटका बसला.
मयूर देशमुख, संत्रा बागायतदार, काजळी, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT