Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Factory : ‘गुरुदत्त शुगर्स’ने शेतकरी हित जोपासले

कारखाना कार्यस्थळावर उत्पादित झालेल्या ५ लाख ३५ हजार साखर पोत्यांचे पूजन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

Team Agrowon

Kolhapur Sugar News : टाकळीवाडीच्या गुरुदत्त शुगर्सने शेतकरी हा केंद्रस्थानी ठेऊन केलेले कार्य कौतुकास्पद व शेतकरीभिमुख असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री व लोकमंगल उद्योग समुहाचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केले.

कारखाना कार्यस्थळावर उत्पादित झालेल्या ५ लाख ३५ हजार साखर पोत्यांचे पूजन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

श्री. देशमुख म्हणाले, दरवर्षी कोट्यवधी रुपये इंधनावर खर्च होत असताना गुरुदत्त शुगर्सने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) उभा करून राष्ट्रहिताचे कार्य केले आहे. सर्वच विभाग आदर्शवत आहेत.

‘गुरुदत्त’ने महापूराच्या काळात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे म्हणाले, गुरुदत्तने नेहमीच नावीन्याचा व आधुनिकतेचा स्वीकार करून कारखानदारीत वेगवेगळे प्रयोग राबवून ते यशस्वी केले आहेत.

या वेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, लोकमंगल मल्टीस्टेट बँकेचे संचालक शीतल शाहणे, संचालक संजय गायकवाड, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील, धोंडीराम नागणे, अण्णासाहेब पवार, सीईओ उदय पाटील व अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी प्रश्नी राजू शेट्टी आक्रमक, २३ मार्चला मुंबई -गोवा महामार्ग रोखणार

Unseasonal Rain: अर्धापुर तालुक्यात वादळी पावसासह गारपीट

Unseasonal Rain: ऐन पाडव्याला सोलापुरात बळीराजाच्या डोळ्यात पाणी

POCRA Scheme: पोकरा अंतर्गंत वैयक्तीक लाभाच्या घटकांसाठी साडेदहा हजारांवर अर्ज

Forest Fire: सिन्नर तालुक्यातील वनसंपदा नष्ट

SCROLL FOR NEXT