Pesticide Agrowon
ॲग्रो विशेष

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

GSP Crop Science Pvt. Ltd : जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि. या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने नुकतेच ‘लायगर’ हे पेटंटेट कीटकनाशक बाजारात आणले आहे.

Team Agrowon

Crop Pesticide : जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि. या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने नुकतेच ‘लायगर’ हे पेटंटेट कीटकनाशक बाजारात आणले आहे. हे दोन उच्च गुणवत्तेच्या मुलद्रव्याचे संयुक्त कीटकनाशक असून, स्पर्शजन्य, आंतरप्रवाही व पोटविष क्रिया करते. त्यामुळे सर्व प्रकारच्या अळ्यांचे प्रभावी नियंत्रण करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

भात पिकासोबतच सोयाबीन, कपाशी, मका, ऊस, टोमॅटो, मिरची, वांगी. कोबी व गळित पिके आणि अन्य भाजीपाला पिके यातील विविध अळ्यांवर वापरता येते. उदा. भात व सोयाबीन पिकातील पाने गुंडाळणारी अळी, खोड अळी, सेमी लुपर, लष्करी अळी, खोड माशी, चाकरी भुंगा, इ.; कपाशीतील गुलाबी बोड अळी; मका पिकातील लष्करी अळी, खोड माशी, व खोड अळी; भाजीपाला पिकातील फळ अळी, नाग अळी, लष्करी अळी, फळ व शेंडा पोखरणारी अळी, डीबीएम इ. अळ्यांचे प्रभावी व दीर्घकाळ नियंत्रण करते.

याचे वैशिष्ट्य म्हणजे फवारणीनंतर अळ्या लगेच खाणे बंद करतात. त्यामुळे पिकांचे नुकसान थांबते. हे मित्र किडी व पर्यावरणास सुरक्षित असल्याचाही दावा कंपनीने केला आहे. उत्पादनाच्या अनावरण प्रसंगी बोलताना कंपनीचे कार्यकारी संचालक भावेश शहा यांनी सांगितले, की ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत भारतात उच्च दर्जाच्या कीटकनाशकांची निर्मिती केली आहे.

यातून ते शेतकऱ्यांस कमी किमतीमध्ये उपलब्ध करणे, देशात रोजगार निर्मिती, आयात कमी करून अर्थव्यवस्थेला बळकटी देणे अशी अनेक उद्दिष्ट्ये कंपनी साध्य करू पाहते.

या वेळी देशभरातील नामांकित विक्रेते, शेतकरी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भावेश शाह, उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे, मुख्य विपणन व्यवस्थापक अमरनाथ चंद्राणी, महाव्यस्थापक विपणन साधू जाधव, विकास प्रमुख दीपक पटेल, तसेच विक्री व्यवस्थापक अजय विश्वकर्मा, जनरल सेल्स मॅनेजर, झोनल मॅनेजर, रिजनल मॅनेजर या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT