Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Unseasonal Rain Crop Loss : यापूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे १ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ९ ते १३ एप्रिल या काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या नुकसानीचे कृषी, महसूल व ग्रामविकास विभागांनी संयुक्त पंचनामे केले आहेत. २८६ गावांतील १२ हजार ८७८ शेतकऱ्यांचे ९९०९ हेक्टरवर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. २७ कोटी २४ लाख १७ हजार ९४० रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत शुक्रवारी (ता. ३) शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात यापूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे १ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे पुन्हा एक लाख ८९ हजार ६८१ हेक्टरचे नुकसान झाले. आता फेब्रुवारीतही अवकाळीने ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. त्यानंतर ९ ते १३ एप्रिल या काळात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे गहू, कांदा, तीळ, ज्वारी व लिंबूवर्गीय पिकांचे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवर नुकसान

जिल्ह्यात फेब्रुवारीत गारपिटीसह अवकाळी पावसाने चार तालुक्यांतील ९ हजार १५२ हेक्टरवर नुकसान झाले. २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने २२ मार्च रोजी शासनाला सादर केला असल्याची माहिती आहे. आचारसंहितेमुळे मदत रखडली.

Crop Damage
Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

आता पुन्हा ९ ते १३ एप्रिल दरम्यानच्या अवकाळीने १९२ गावांतील ९३६८ हेक्टरवर बागायती पिकांचे नुकसान झाले. याचा ११ हजार ६४६ शेतकऱ्यांना फटका बसला असून २५ कोटी २९ लाख ५३ हजार ८२० रुपयांची मागणी केली आहे. तर फळ पिकांचे ९४ गावांत ५४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. याचा १ हजार २३२ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यापोटी १ कोटी ९४ लाख ६४ हजार १२० रुपयांची मागणी केली आहे.

एप्रिलअखेरच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू

जिल्ह्यात २३ एप्रिलला पुन्हा गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने १ हजार ३१३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, ज्वारी, लिंबू, फळबागा, पानपिंपरीचा नुकसान क्षेत्रात समावेश आहे. १२८ घरांची पडझड व तीन बैलांसह ७०० कोंबड्या दगावल्या. अकोला, बार्शीटाकळी, अकोट, पातूर तालुक्यांत नुकसान झाले आहे. याचे आता सर्वेक्षण सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com