Women Employment  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Nuts : ओल्या काजूगरांना वाढती मागणी

Women Employment : येत्‍या काही दिवसांत काजूचा हंगाम सुरू होत असल्‍याने आदिवासी महिलांना यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो.

Team Agrowon

Pen News : येत्‍या काही दिवसांत काजूचा हंगाम सुरू होत असल्‍याने आदिवासी महिलांना यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. पेण तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्या अनेक आदिवासी महिला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरातील बाजारपेठेत ओल्या काजूगरांची विक्री करत असल्याने यातून त्‍यांना दिवसाकाठी आठशे ते हजार रुपयांची कमाई होत असते.

कोकणातील आंबा, काजू, फणस याबरोबरच ओल्या काजूगरांना मोठी मागणी असते. साधारणपणे उन्हाळ्यात काजूगर बाजारात विक्रीसाठी येत असतात. हा रानमेवा शुद्ध पौष्टिक, बलवर्धक व शरीराला आरोग्यदायी असल्याने त्‍याची दिवसेंदिवस बाजारात मागणी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून काजूगरांच्‍या बियांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्‍यामुळे आदिवासी महिला डोंगराळ भागातून ओल्या काजूगर बिया गोळा करत विक्रीसाठी आणतात.

शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये बसून आदिवासी महिला काजूगराच्‍या बिया धारदार विळ्याने कापून त्यातील अर्धे अर्धे गोळे बाजूला करत हिरव्या पानावर त्यातील किमान २० ते २५ बिया मांडून विक्रीसाठी अशाप्रकारे वाटा ठेवण्यात येतो. यातील तीन ते चार वाटे १०० रुपयांना विक्री केले जातात. त्‍यामुळे दिवसाकाठी एक महिला या ओल्या काजूगरांच्या विक्रीतून सुमारे ८०० ते १००० रुपयांची कमाई करते. त्यामुळे येत्या तीन ते चार महिन्यांत त्यांना रोजगार उपलब्ध होतो.

पेणच्या डोंगराळ भागातून काजूगराच्या बिया गोळा करत आम्ही बाजारात आणून त्याची विक्री करत आहोत. या अख्ख्या असणाऱ्या बिया विळ्याच्या साह्याने वेगळ्या करून काढल्या जातात. यादरम्यान अनेकदा बोटांना इजा झाली आहे; परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करावा लागतो. हंगामाच्या दिवसांत बियांना ग्राहकांची चांगली मागणी असते.
यमीबाई शिद, काजूगर विक्रेता महिला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Student Travel: शिक्षणासाठी पाच लाखांवर मुलांचे ‘अप-डाउन’

Bogus Voter List: मतदार यादीत घोळ, मात्र आयोग कारवाई करणार नाही : पवार

Turmeric Rate: हळदीच्या दरावरील दबाव कायम

Banana Rate: हंगामी फळांची आवक वाढली, केळी दरांना फटका

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

SCROLL FOR NEXT