Cashew Seed : अन्य पिकांप्रमाणे काजू बीला हमीभाव द्या

Farmer Demand : काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येकडे शासनाने प्राधान्याने लक्ष देऊन अन्य पिकांप्रमाणे काजूला हमीभाव द्यावा.
Cashew Seed
Cashew SeedAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : अवकाळी पावसासह अन्य विविध कारणांमुळे आधीच प्रतिकूल स्थिती, मशागत खर्चामध्ये झालेली वाढ आणि त्या तुलनेत मिळणारा काजूला अल्प भाव यामुळे काजू बागायतदार, शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरता मेटाकुटीस आला आहे.

त्यामुळे काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येकडे शासनाने प्राधान्याने लक्ष देऊन अन्य पिकांप्रमाणे काजूला हमीभाव द्यावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार असल्याचे प्रगतिशील शेतकरी अमर खामकर यांनी सांगितले.

Cashew Seed
Cashew MSP : अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजूला हमीभाव जाहीर करण्याची मागणी

लांजा येथील सह्याद्री शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या बैठकित शेतकऱ्यांनी काजू उत्पादनाविषयी चर्चा केली. सह्याद्री शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील काजू बागायतदार, शेतकरी यांच्याशी संपर्क आणि संवाद साधून काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी एकत्रितरीत्या शासन दरबारी लढा उभारण्यात येणार आहे.

काजू पिकासंबंधित विविध समस्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने शासन दरबारी लढा उभारण्याच्या उद्देशाने लांजा येथे सह्याद्री शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लांजा येथे शेतकऱ्यांची अमर खामकर यांच्या आरगाव येथील निवासस्थानी बैठक झाली.

Cashew Seed
Cashew Orchard : काजू बागेत खतांसह कीड, रोग व्यवस्थापनावर भर

या बैठकीला विनोद हांदे, अमर खामकर, सुहास हांदे, हरेश जाधव, जितेंद्र खामकर, शाताराम धुळप, रवींद्र खामकर यांच्यासह शेतकरी, बागायतदार उपस्थित होते. या प्रसंगी काजू बागायतदारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत काजू लागवडीवर भर दिला आहे.

मात्र अवकाळी पाऊस, कीड-रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे काजू पीक धोक्यात आले आहे. मशागतीच्या खर्चातही वाढ झाली आहे. या स्थितीमध्ये खर्च आणि उत्पन्न यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. त्यामुळे काजू बीचा व्यावसाय आतबट्ट्याचा झाला आहे. यामधून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने हातभार लावावा, अशी मागणी केली जाणार आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com