Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Groundwater Level : सांगली जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षांत स्थिर

Water Storage : गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील भूजल साठा तुलनेने स्थिर राहिला आहे. यंदाच्या जानेवारी अखेर केलेल्या निरीक्षणात हा साठा किंचित घटला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील भूजल साठ्याचे भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून वर्षातून चार वेळा निरीक्षण करण्यात येते. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील भूजल साठा तुलनेने स्थिर राहिला आहे. यंदाच्या जानेवारी अखेर केलेल्या निरीक्षणात हा साठा किंचित घटला आहे. जिल्ह्यातील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षात वाढ न होता स्थिर राहिला आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर-२०२२ अखेर जिल्ह्यातील भूजल पातळीत ०.९७ मीटरने वाढ झाली होती. तर सन २०२३ मध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या मॉन्सूनोत्तर चाचणीचा अहवाल तयार झाला असून यात पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी एक मीटरने भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले होते.

२०२३ मध्ये पाच वर्षांतील सरासरी स्थिर भूजल पातळी ३.३४ मीटर होती. त्यात घट होऊन सप्टेंबरमधील स्थिर भूजल पातळी ४.३३ मीटरवर होती. जानेवारी २०२० ते जानेवारी २०२४ या काळात सरासरी ४.९८ मीटर इतका भूजल पातळी आहे. जिल्ह्यातील ८७ विहिरींचे निरीक्षण करण्यात येते. यात दुष्काळी तालुक्यातील ६६ विहिरींचा समावेश आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये केलेल्या निरीक्षणामध्ये ही पातळी किंचित घटून ४.६५ मीटर इतकी आहे.

गेल्या पाच वर्षाच्या जानेवारी महिन्यातील भूजल पातळीच्या तुलनेत जानेवारी २०२५ मध्ये केलेल्या निरीक्षणामध्ये ३३ विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे तर ५४ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, असे भूजल सर्वेक्षण विभागाकडून केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

अटल भूजल योजना

ग्रामीण भागातील भूजल व्यवस्थापन सक्षम करणेसाठी अटल भूजल योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील अतिशोषीत, शोषीत आणि अंशत:शोषीत पाणलोट क्षेत्रांना यात प्राधान्य दिलेले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सहा पाणलोट क्षेत्रातील ९४ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये कवठेमंकाळ तालुक्यातील ४४, खानापूर तालुक्यातील १३, जत तालुक्यातील २१, तासगाव तालुक्यातील १४ आणि मिरज तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे.

तालुकानिहाय विहिरीतील भूजल पातळीचे निरिक्षण (मीटरमध्ये)

तालुका निरीक्षण विहिरीची संख्या जानेवारी २०२५ मधील सरासरी स्थिर भूजल पातळी जानेवारी २०२० ते २०२४ मधील सरासरी भूजल पातळी

आटपाडी १३ ४.७९ ४.८३

जत २० ५.८३ ५.८७

कवठेमहांकाळ १५ ४.३३ ५.१९

कडेगांव ६ ५.३० ६.००

खानापूर ९ ६.०५ ६.३१

मिरज ६ ४.५८ ४.९१

पलूस ३ २.९७ ३.०४

शिराळा ६ २.६५ ३.०१

तासगाव ३ ६.६० ६.८७

वाळवा ६ ३.४३ ३.७९

एकूण ८७ ४.६५ ४.९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Biofertilizers: जैविक निविष्ठांच्या विक्रीतून ‘महाबीज’ला २.३९ कोटींचा महसूल

Vidarbh Fuel Shortage: विदर्भात ऐन खरीप हंगामात डिझेल टंचाईचा फटका

Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम

Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनमधील तेजी टिकून तूर, मका हरभरा भाववाढीचे संकेत

Solapur Diesel Shortage: पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील मशागतीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT