Groundwater Level  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundwater Level : साताऱ्यातील जावळी, कऱ्हाडमध्ये भूजल पातळीत घट

Water Storage : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जमिनीतील पाणी पातळी घटू लागली आहे. यामध्ये जावळी तालुक्यात १.३६ मीटर, तर कऱ्हाड तालुक्यात ०.१५ मीटरने भूजल पातळी घटली आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जमिनीतील पाणी पातळी घटू लागली आहे. यामध्ये जावळी तालुक्यात १.३६ मीटर, तर कऱ्हाड तालुक्यात ०.१५ मीटरने भूजल पातळी घटली आहे. मात्र, उर्वरित तालुक्यात १.५२ मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हात जावळी, कऱ्हाडमधील भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बोअरवेल, विहिरीमधील पाणी पातळी कमी झाल्याने ग्रामीण भागात पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

यंदा जिल्ह्यातील १०६ विहिरींचे मार्चमध्ये निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये सरासरी भूजल पातळी ५.७३ मीटरवर स्थिर होती. सरासरीच्या भूजल पातळीत ०.४२ मीटरने वाढ झाल्याचे निरीक्षणावरून समोर आले आहे. जावळी तालुक्यात एका विहिरीचे निरीक्षण केले असता भूजल पातळी ४.५० मीटरने स्थिर असली तरी १.३६ मीटरने पाणी पातळी घटली आहे.

कऱ्हाड तालुक्यात १५ विहिरींचे निरीक्षण केले असता सरासरी भूजल पातळी ४.४५ मीटर स्थिर असली तरी पाणी पातळी ०.१५ मीटरने घटली आहे.
खंडाळा तालुक्यात ५ विहिरींची भूजल पातळी ०.१८ मीटर, खटाव तालुक्यात १७ विहिरींची भूजल पातळी ०.०८ मीटर, कोरेगाव तालुक्यात ९ विहिरींची भूजल पातळी ०.२५ मीटर, माण तालुक्यात १६ विहिरींची भूजल पातळी ०.४५ मीटर, महाबळेश्वर तालुक्यात ३ विहिरींची भूजल पातळी १.३० मीटर, पाटण तालुक्यात १० विहिरींची भूजल पातळी ०.६६ मीटर, फलटण तालुक्यात १२ विहिरींची भूजल पातळी १.५२ मीटर, सातारा तालुक्यात १० विहिरींची भूजल पातळी ०.७१ मीटर, वाई तालुक्यात ८ विहिरींची भूजल पातळी १.०२ मीटरने वाढली आहे.

आठवड्यात दोनदाच पाणी
भूजल पातळी घटल्याने गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये खडखडाट झाला आहे. अनेक गावांमध्ये आठवड्यातून दोनदा पाणी येत असल्याने पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली असून, शहरी भागातही पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे मे महिन्यात आणखी भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागामार्फत जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या निरीक्षण विहिरींची भूजल पातळी ही मार्चमध्ये घेण्यात आली होती. त्यानुसार दोन तालुक्यात भूजल पातळीत घट दिसत असून, अन्य तालुक्यात भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. मेघा शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

Agriculture Warehouse : गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रासाठी सेवा पुरवठादार

SCROLL FOR NEXT