Ground Water Level  Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीत १.३३ मीटरने वाढ

Water Level Update : परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यातील भूजल पातळी मध्ये सरासरीच्या तुलनेत १.३३ मीटरने वाढ झाली.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यातील भूजल पातळी मध्ये सरासरीच्या तुलनेत १.३३ मीटरने वाढ झाली. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने घेतलेल्या भूजल पातळीच्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ८६ निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. जिल्ह्यातील २०१९ ते २०२३ या पाच वर्षातील सरासरी भूजल पातळी ५.३३ मीटर आहे.

तर जिल्ह्यात गतवर्षीच्या (२०२३) तुलनेत यंदा जास्त पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात जून,जुलै मध्ये सरासरीहून जास्त तर ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पाऊस झाला. सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी झाली. त्यामुळे भूगर्भात मोठ्या प्रमाणात पाणी मुरले.

जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ४ मीटर असल्याचे आढळून आले असून सरासरीच्या तुलनेत १.३३ मीटरने वाढ झाली आहे. भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे यंदा रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहू शकते. पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे.

परंतु उपलब्ध पाण्याची नासाडी टाळून कार्यक्षमरित्या वापर करून जास्तीजास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी सिंचनासाठी ठिबक, तुषार सिंचन पध्दतीचा अंगीकार करण्याची गरज आहे, असे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT