Neera Karha Upsa Irrigation Scheme : बारामतीचा जिरायत शिक्का पुसणार

Agriculture Scheme : गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीच्या काही भागावर असलेला जिरायत हा शिक्का कायमचा पुसून टाकण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी नीरा कऱ्हा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Neera Karha Upsa Irrigation Scheme
Neera Karha Upsa Irrigation Scheme Agrowon
Published on
Updated on

Baramati News : गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीच्या काही भागावर असलेला जिरायत हा शिक्का कायमचा पुसून टाकण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी नीरा कऱ्हा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Neera Karha Upsa Irrigation Scheme
Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आयोजित मेळाव्यात याबाबत माहिती दिली. जवळपास ४५ हजार एकराला या योजनेमुळे पाणी मिळणार आहे. त्यामुळे उसासारखे पीक या परिसरात शेतकऱ्यांना योजनेच्या कार्यान्वयनानंतर घेता येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Neera Karha Upsa Irrigation Scheme
Nira-Karha Irrigation Scheme : नीरा-कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार

या योजनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘‘या योजनेत २.३० मीटर व्यासाची पाइपलाइन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २३,२८६ व दुसऱ्या टप्प्यात १४,९९५ अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. एकूण १७ किलोमीटर लांबीची ही पाइपलाइन असेल. या योजनेमध्ये नीरा डावा कालव्याच्या प्रभावक्षेत्राबाहेरील ३३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेत समाविष्ट गावे

वाकी, भिलारवाडी, मुढाळे, ढाकाळे, चोपडज, चौधरवाडी, देऊळवाडी, गडदरवाडी, मगरवाडी, सस्तेवाडी, खंडोबावाडी, पणदरे, वाघळवाडी, करंजेपूल, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, जळकेवाडी, खामगळवाडी, सोनकसवाडी, कुरणेवाडी, माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, कऱ्हावागज, बारामती ग्रामीण, नेपतवळण, मेडद, काळखैरेवाडी, शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी, जळगाव सुपे, अंजनगाव (यात नीरा डावा कालवा व जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्राबाहेरील भागाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com