Groundnut Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Crop : खानदेशात भुईमूग पीक जोमात; पेरणी क्षेत्रात वाढ

Groundnut Cultivation : खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीपर्यंत झाली. पीक जोमात असून, यंदा क्षेत्र अडीच हजार हेक्टरवर स्थिर आहे. सर्वाधिक पेरणी चोपडा (जि. जळगाव) तालुक्यात झाली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीपर्यंत झाली. पीक जोमात असून, यंदा क्षेत्र अडीच हजार हेक्टरवर स्थिर आहे. सर्वाधिक पेरणी चोपडा (जि. जळगाव) तालुक्यात झाली आहे.

भुईमुगासाठी खानदेशातील सातपुडा पर्वतालगतचा भाग प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या भागात भुईमुगाची पेरणी अधिकची केली जाते. खानदेशात मध्यंतरी भुईमुगाची पेरणी घटली होती. ही पेरणी फक्त ४०० ते ४५० हेक्टरवर मर्यादित होती. कारण पाऊसमान तीन वर्षांपूर्वी कमी होते. तसेच दरांबाबतही समाधानकारक स्थिती नव्हती. परंतु चांगला पाऊस व कोविडनंतर दरातील स्थैर्य यामुळे शेतकरी भुईमुगाची पेरणी किंवा लागवड करू लागले. यंदा चांगल्या पावसामुळे लागवड वाढेल, असे सांगण्यात येत होते. अर्थात पेरणी वाढली आहे.

अलीकडे जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा भागातही पेरणी होऊ लागली आहे. मागील दोन वर्षे तेलबियावर्गीय पिकांचे दर स्थिर आहेत. यात भुईमुगासही पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला आहे. तसेच एकरी सात ते आठ क्विंटल शेंगांचे (वाळविलेल्या) उत्पादन अनेकांनी घेतले आहे.

काही शेतकऱ्यांनी विक्री १० ते १२ क्विंटल उत्पादनदेखील घेतले. मका, गहू आदी पिकांच्या तुलनेत भुईमूग परवडल्याने शेतकरी या पिकास पसंती देत आहेत. मागील दोन वर्षे क्षेत्र सातत्याने वाढले.

जानेवारीत अधिक पेरणी

खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीत अधिक झाली असून, अनेक शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाच्या मदतीने सिंचन करीत आहेत. यामुळे पाणी कमी लागत असून, पीकस्थिती सध्या बरी आहे. मागील महिन्यातही काही शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे. लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. पीक जोमात आहे. शेंगा लागल्या असून, त्या पक्व होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT