Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Production : खानदेशात केळी कंदांखाली क्षेत्र अधिक

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मृग बहरातील केळीची लागवड गतीने सुरू आहे. कंदांसह रोपांना मोठी मागणी आहे. यातच अनेकांनी लागवड उरकली आहे. रोपांचा पुरवठादेखील करून घेतला आहे. सध्या कंदांचा पुरवठा अधिक व लागवडीची कार्यवाही बंद अशी स्थिती असल्याने कंदांचे दर घसरले असून, ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित (टिश्यू) रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर प्रतिकंद तीन रुपयांपर्यंत आहेत.

ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित (टिश्यू) रोपांच्या केळी बागांमधील कंदांना खानदेशात कांदेबाग केळी लागवडीसाठी मोठी मागणी होती. ही मागणी मागील आठवड्यातही बऱ्यापैकी होती. परंतु या आठवड्यात कंदांचे दर घसरले आहेत. प्रतिकूल स्थिती, पाऊस, केळी लागवडीबाबत शेतकऱ्यांनी पुढे ढकललेले नियोजन व कंदांचा अधिकचा पुरवठा यामुळे दरात घसरण झाली आहे.

पंधरवड्यात ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर प्रतिकंद चार ते पाच रुपये, असे होते. यात केळी कंद काढण्याची मजुरी व शेतकऱ्याने कंद वाहतुकीसाठी आणलेल्या वाहनात कंद भरून देण्याची कार्यवाहीदेखील करून देण्याची जबाबदारी कंद मालकाकडे होती. परंतु मागील चार ते पाच दिवसात ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर घसरले आहेत.

अनेक कंद मालक किंवा पुरवठादार शेतकरी प्रतिकंद तीन रुपये दर घेवू लागले आहेत. तर काही शेतकरी अडीच रुपये प्रतिकंद असे दर घेण्याची तयारीदेखील दाखवीत आहेत. मृग बहर केळी लागवडीचा काळ हा मे ते जुलै या महिन्यात अनुकूल मानला जातो. जुलैत बागांची लागवड केली जाते. पुढे पाऊस आल्यास अडथळा येईल, हे लक्षात घेऊन केळीची लागवडीस गती दिली आहे.

कंद पुरवठादार एजंट सक्रिय

तूर्त केळी लागवड कमी करण्याचे किंवा पुढे करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करताच कंद पुरवठादार, एजंट, कंद मालकांनी सोशल मीडियात आपल्या कंदांचे दर व इतर माहितीची जाहिरात प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर कमी दरात व वेळेत दिले जातील, आपली आगाऊ नोंदणी करून घ्या, असे संदेश सोशल मीडियात मागील दोन दिवसांपासून फिरू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

Neera Karha Upsa Irrigation Scheme : बारामतीचा जिरायत शिक्का पुसणार

Agriculture Input Subsidy : निविष्ठांचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

SCROLL FOR NEXT