Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा योजनेला जुन्नर तालुक्यात मोठा प्रतिसाद

Agriculture Update : या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, ३१ जुलैपर्यंत तालुक्यात सुमारे ५५ हजार शेतकरी नोंदणी करून योजनेत सहभागी होतील.

Team Agrowon

Junnar News : खरीप हंगामातील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील सोमवारअखेर (ता.१५) जुन्नर तालुक्यातील ३०३ हजार २८६ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी केली आहे. ही नोंदणी जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.

मागील वर्षी तालुक्यातील २७ हजार शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळाला असून, सुमारे १३ कोटी २७ लाख रुपये विमा भरपाई मिळाली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, ३१ जुलैपर्यंत तालुक्यात सुमारे ५५ हजार शेतकरी नोंदणी करून योजनेत सहभागी होतील, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन पीकविमा काढून सुरक्षा कवच मिळवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी केले आहे.

खरिपातील पिकासाठी ही विमा योजना असून, नैसर्गिक आपत्ती, कीड-रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. आपले सरकार सेवा केंद्र सीएससी धारकांस विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज ४० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

बिगर कर्जदार शेतकरी आपल्या पिकांचा विमा जवळच्या राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी आदी वित्तीय संस्थेमार्फत घेऊ शकतात. प्रादेशिक ग्रामीण बँका, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी)/https://pmfby.gov.in/farmerLogin वेबसाइट लिंकद्वारे स्वतःच्या पीक विमा नोंदणी करू शकतात. पीक विमा योजनेसंबंधित अधिक माहितीसाठी, कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन (KRPH) क्रमांक : ९१४४४७ वर उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT