Grape Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Crop In Crisis : पावसामुळे राज्यातील द्राक्ष पीक संकटात

Maharashtra Grape Damage : द्राक्ष पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे राज्यात द्राक्ष उत्पादनात ३५ टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी पावसामुळे द्राक्षाच्या सूक्ष्म घड निर्मितीवर परिणाम झाला.

Team Agrowon

Sangli News : द्राक्ष पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे राज्यात द्राक्ष उत्पादनात ३५ टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी पावसामुळे द्राक्षाच्या सूक्ष्म घड निर्मितीवर परिणाम झाला. दरम्यान, बागा वाचविण्यासाठी एकरी दुप्पट खर्च झाल्यामुळे आर्थिक गणित विस्कटले आहे.

यंदा द्राक्ष हंगाम आटोपल्यानंतर एप्रिलअखेरपर्यंत खरड छाटण्या उरकल्या. खरड छाटणीमुळे पुढील हंगामातील सूक्ष्म घड निर्मिती आणि काड्यांची अपेक्षित वाढ होण्यास मदत होते. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांत द्राक्ष पट्ट्यात अतिवृष्टी झाली. त्याचा परिणाम सूक्ष्म घड निर्मितीवर झाला. तसेच बागांवर करपा, भुरी, डाऊनी, थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. काडी तयार करण्यासाठीच्या खर्चातही वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पोषक वातावरणामुळे घड निर्मिती होईल. परंतु कधी ढगाळ वातावरण, पावसाची रिमझिम यामुळे अजूनही अडचणी आहेत. या दरम्यान, खरड छाटणीनंतर पावसामुळे बागा वाचविण्यासाठी प्रति एकर दुप्पट खर्च झाल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

द्राक्ष पट्ट्यातील काही भागात फळ छाटणी येत्या पंधरा-वीस दिवसांनंतर सुरू होईल. मात्र बहुतांश ठिकाणी सप्टेंबरपासून फळ छाटणीला गती येते. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पुन्हा पाऊस आणि वातावरणात बदल झाले तर घड जिरण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती यंदा पहिल्यांदाच उद्भवली आहे.

फळ छाटणी ऑगस्टपासून

यंदाच्या हंगामातील आगाप द्राक्ष फळ छाटणीचे नियोजन शेतकरी करू लागला आहे. काही भागात जुलै अखेरपासून फळ छाटणी सुरू होते. मात्र काही भागात ढगाळ वातावरण आहे, हलका पाऊस सुरू आहे.

त्यामुळे जुलै अखेरपासून सुरू होणारी फळ छाटणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल. मात्र जुलैच्या अखेर किंवा ऑगस्टमध्ये पावसाला सुरुवात झाली, तर आगाप फळ छाटणी लांबणीवर पडू शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा दीड-दोन महिने अगोदर झालेल्या पावसामुळे द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. परिणामी, उत्पादन घटण्याचा अंदाजही आहे. परिस्थिती बिकट बनली आहे. शेतकऱ्यांमधील उत्साह कमी झाला असल्याचे चित्र आहे.
- कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी

Assembly Elections Update: देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका वेळेआधीच होण्याची शक्यता; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदानाची शक्यता!

Livestock Vaccination Campaign: कवलापूर येथे मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

Maharashtra Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून, कामकाज ३ आठवडे चालणार

Organic Fertilizer: शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा : सुधीर शिंदे

SCROLL FOR NEXT