Unseasonal Rain agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : द्राक्ष, डाळिंब बागायतदार चिंतेत; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

Maharashtra Rain : उत्तर महाराष्ट्रासह, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली.

sandeep Shirguppe

Unseasonal Rain Maharashtra : मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला. दरम्यान लाखो हेक्टर शेती पिकाला याचा मोठा दणका बसला आहे.

दरम्यान उत्तर महाराष्ट्रासह, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.

या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंबांना फटका बसला असून, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फायदा झाला आहे. मागच्या दोन दिवसांत सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमट आणि ढगाळ वातावरण असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.

मंगळवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली दुपारनंतर अवकाळी पावसाने मिरज, सांगली शहरासह कवठेमहांकाळ जत तालुक्यांत हजेरी लावली आहे. या तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब बागांना अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसला आहे. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष, डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांना फायदा होणार आहे.

शाळूसह द्राक्षबागांचे नुकसान

या पावसामुळे शाळूसह द्राक्षबागांवर संकट निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वातावरण बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे ऐन फुलोऱ्यामध्ये असणाऱ्या द्राक्षांचे लहान मणी गळून पडल्याने द्राक्ष घडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काढणीसाठी आलेल्या द्राक्षांचे मणी चिरल्याने सुमारे चारशे रुपये दर मिळणारा आता केवळ अडीचशे रुपयांपर्यंत खाली आला आहे.

राज्यात आज येलो अलर्ट

आज (ता.३०) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' कायम आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानात मोठी घट झाली असून, किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर विदर्भातील महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT