Mumbai News : राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन योजनांना वाढता खर्च पेलवत नसल्याने देण्यात येणाऱ्या अनुदानापोटी १५ योजनांना पाच कोटी ८२ लाख रुपये वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या संस्था सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील असून २५ टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या प्रकल्प खर्चामध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. अल्प आणि सीमांत शेतकरीच नव्हे तर मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांनासुद्धा वाढता खर्च करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे झाले आहे. सरकारच्या खर्चाने ज्या लहान-मोठ्या पाटबंधारे योजना हाती घेण्यात येतात ता योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही खर्चाविना पाण्याची सोय करते असा सरकारचा दावा आहे.
याउलट इतर भागातील शेतकऱ्यांना स्वखर्चाने उपसा जलसिंचन योजनांची व्यवस्था करावी लागते. त्याचा संपूर्ण खर्च उचलावा लागतो. त्यामुळे सहकारी उपसा जलसिंचन योजनाच्या लाभधारक सभासदांवरील खर्चाचा बोजा कमी करून तो काही प्रमाणात सरकारने उचलावा यासाठी राज्य सरकारने १९९४ पासून अनुदान देण्यात येते. या वर्षी १५ सहकारी उपसा जलसिंचन योजनांना ५ कोटी ८२ लाख २० हजार रुपये अनुदान देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
हा निधी वितरित झाल्यानंतर प्रत्यक्ष उपसा सिंचन योजनेची पाहणी करून निधीचा योग्य वापर झाल्याची खात्री करावी. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी असे आदेश सहकार आयुक्त आणि सहकार संस्था निबंधकांना काढण्यात आले आहेत.
अनुदान जाहीर झालेल्या संस्था
अनुदान जाहीर झालेल्या संस्थांमध्ये भैरवनाथ सहकार पाणीपुरवठा संस्था, गाताडवाडी, वाळवा. छत्रपती राजर्षी शाहू सहकारी पाणीपुवरठा संस्था, बेले, करवीर,कोल्हापूर. लक्ष्मी शेतकरी सहकारी पाणीपुरवठा संस्था, करोली, मिरज. अहिरवाडी तुजारपूर-उरुण सहयुक्त पाणीपुरवठा संस्था, वाळवा. भाग्यलक्ष्मी सहकारी पाणीपुरवठा संस्था, पलूस. आदिनाथ सहकारी ठिबक जलसिंन संस्था, वसगडे, पलूस.
राजर्षी शाहू सहकारी पाणीपुरवठा संस्था, किणी, हातकणंगले. गंगा भागीरथी सहकारी पाणीपुरवठा संस्था, बेलवळे, कागल. सद्गुरू बाबा महाराज सहकारी पाणीपुरवठा संस्था, आपटाळ पैकी कुदळवाडी, राधानगरी. आमदार विनय कोरे सहकारी पाणीपुरवठा संस्था, तासगाव, हातकणंगले. शुभलक्ष्मी विनय कोरे सहकारी पाणीपुरवठा संस्था, तासगाव, हातकणंगले यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.