Water Supply Scheme : उन्हाळ्याच्या तोंडावरच भोसे पाणीपुरवठा योजना बंद

Water Scarcity : २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या भागात पाण्यावरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले. त्यावेळी लोकवर्गणीची अट रद्द करून स्व.आ. भारत भालके यांनी या भागातील नागरिकांसाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली.
Bhose Water Supply Scheme
Water Supply Scheme Agrowon
Published on
Updated on

Solapur News : भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा या ३९ गावांची तहान भागवणाऱ्या योजनेचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद असून, योजनेतील शिखर समितीच्या अध्यक्षाचा सरपंचपदाचा कार्यकाल संपला तर सचिवाने योजनेचा राजीनामाच दिल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत या भागात पाण्यावरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले. त्यावेळी लोकवर्गणीची अट रद्द करून स्व.आ. भारत भालके यांनी या भागातील नागरिकांसाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली. सध्या या लाभक्षेत्रातील अनेक गावात म्हैसाळचे पाणी आल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाल्याने त्या ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या योजना असल्यामुळे या योजनेचे पाणी घेण्यास तूर्त नकार दिला.

मात्र येत्या काही दिवसांत त्या गावातून देखील पाणी मागणी होऊ शकते. सध्या ९ गावे या योजनेवर अवलंबून आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्यामुळे सलगर बुद्रूक परिसर व सिद्धनकेरी, जालिहाळ, भाळवणी परिसरातील पाणीपुरवठा बंद आहे. यादरम्यान उचेठाण येथील पंप हाऊसमधील विद्युत पुरवठ्यातही बिघाड झाला. सध्या या योजनेचे अडीच कोटींच्या पुढे वीजबिल थकीत आहे.

Bhose Water Supply Scheme
Water Supply Scheme : भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर बंदचे सावट

दुसऱ्या बाजूला येणेबाकीचे रक्कम तोकडी असल्यामुळे ही योजना चालवणे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सध्या अनेक गावात भूजल पातळी घसरल्यामुळे पाणीटंचाई भासू लागल्यामुळे साडेचार महिन्यासाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही लोकांना व जनावरांना जगण्याचा आधार ठरणार आहे.

Bhose Water Supply Scheme
Water Supply Scheme : पाइपलाइन टाकण्याचे काम रेंगाळल्याने अडचण

मात्र, या योजनेचे अध्यक्ष हुन्नुरच्या सरपंच मनीषा खताळ यांच्या सरपंचपदाचा कार्यकाल संपूनही ते सामाजिक बांधिलकी म्हणून या योजनेचे थांब पाहत आहेत. सध्या पाइपलाइन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही. शिवाय ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी भरण्याचे प्रमाण देखील कमी आहे, अशा परिस्थितीत कर्मचारी पगार व दुरुस्तीस निधी नसल्यामुळे ते देखील मोठ्या अडचणीत सापडले.

दुसऱ्या बाजूला या समितीचे सचिव असलेले हुन्नूरच्या ग्रामसेवकांनी नियमित कामकाज सोडून अतिरिक्त काम करण्यास नकार देत राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना व जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन गंभीर नाही. शिखर समितीचा पाणीपट्टी वसुलीसाठी प्रभाव पडत नसल्यामुळे या योजना चालवण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे देण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com