Governor Visits Nashik Agrowon
ॲग्रो विशेष

Ramesh Bais : शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन प्रयत्नशील : राज्यपाल रमेश बैस

Governor Visits Nashik : नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल रमेश बैस यांनी कुशेगाव, ता. इगतपुरी येथे ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणीची माहिती घेतली.

Team Agrowon

Nashik News : ‘‘मी स्वत: शेतकरी पुत्र आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (ता. २१) केले.

इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावात मंगळवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत कृषी विभागामार्फत ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी बैस बोलत होते. या वेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, राज्यपालांच्या सचिव श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सहायक जिल्हाधिकारी जितीन रेहमान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.

शिरसाटे गावातील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र केदार यांच्या शेतातील टोमॅटो पिकावर ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक बैस यांच्यासमोर सादर करण्यात आले. या वेळी ‘इफ्को’चे क्षेत्र अधिकारी निमिष पवार, कृषी विज्ञान केंद्र मुक्त विद्यापीठाचे प्रशिक्षण सहयोगी हेमराज राजपूत यांनी नॅनो युरिया फवारणी बाबतची तांत्रिक माहिती व फायदे विशद केले.

‘शेतीला दिवसा वीज द्या’

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. यातच शेतीला दिवसा वीज मिळत नाही. ग्रामीण भागात आठ-आठ तास वीज नसते. शेतीला दिवसा वीज व पाणी मिळावे, शेतीला जोडधंदा मिळावा, असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी राज्यपालांसमोर मांडले. शेतकरी भास्कर मते यांनी सेंद्रिय शेतीचा अनुभव सांगत, रासायनिक खतांचा वापर करीत नसून सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात, असे सांगितले.

त्यावर बैस यांनी रासायनिक व सेंद्रिय खत वापरातून मिळालेल्या उत्पादनाबाबत जाणून घेतले. त्यानंतर, मते म्हणाले, ‘‘शेतीमालाला भाव मिळत नाही. विजेची समस्या मोठी आहे. दिवसभर वीज नसते. रात्री वीज मिळते. त्यानंतर पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.’’ ‘‘शेती व्यवसायावर अवलंबून राहून चालणार नाही. जोड व्यवसायाला सरकारने साह्य करावे,’’ असे केदार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT