Bhimashankar Temple Pilgrim Guidelines: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून (ता. १५) भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले असून, दररोज एक हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून पास घेणे अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे..प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही..Bhimashankar Mandir Reopen: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून दर्शनासाठी खुले होणार.नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर परिसरात विविध सुविधा उभारण्याची कामे सुरू आहेत. नवीन सभामंडप आणि इतर कामांमुळे देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंद कालावधीला ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती..Heritage Tourism: भीमाशंकरची ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असे गाव होणार : फडणवीस.मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी साधारण एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना, स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि संस्थान यांच्या सहकार्यामुळे हे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करण्यात यश आले. मुख्य सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून, दर्शन व्यवस्था, परिसर स्वच्छता, गर्दी नियंत्रण आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत..भाविकांनी मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून दर्शन व्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी व पास मिळविण्यासाठी भाविकांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.