Mango Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Festival : आंबा, काजू हंगाम संपल्यावर कृषी महोत्सवास मान्यता

Kokan Mango Cashew Festival : राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहक मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल उपलब्ध व्हावा तसेच विपणन साखळी तयार करण्यासाठी २०२० पासून जिल्हा कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यात येते.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील आंबा आणि काजू हंगाम संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारने एप्रिल ते मेदरम्यान कोकणात कृषी महोत्सव आयोजित करावा, असे आदेश काढले आहेत. वास्तविक कृषी आयुक्तालयाने एप्रिल महिन्यात पत्र पाठविले होते. मात्र त्याचे आदेश जून महिन्यात काढले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहक मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल उपलब्ध व्हावा तसेच विपणन साखळी तयार करण्यासाठी २०२० पासून जिल्हा कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. या कृषी महोत्सवांमध्ये विविध कंपन्यांची दालने, शेतीमाल, खाद्य पदार्थांचे स्टॉल, कृषी तंत्रज्ञान, विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महामंडळ, फळे, फुले, भाजीपाला यांचे स्टॉल असतात.

तसेच शेतकरी सन्मान, परिसंवाद, चर्चासत्रे आदींचे आयोजन करण्यात येते. तसेच हा पाच दिवसांचा महोत्सव ऑक्टोबर ते मार्चदरम्यान घेण्यात येतो. मात्र फळांच्या हंगामासाठी विशेषत: काजू आणि आंबा हंगामासाठी हा कालावधी योग्य नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. कोकण विभाग हा फलोत्पादनासाठी ओळखला जातो. तेथे आंबा व काजू या पिकांची मोठे उत्पादन आहे.

ही दोन्ही उत्पादने एप्रिल व मे महिन्यांत विक्रीकरिता उपलब्ध असतात. तसेच राज्यातील आणि राज्याबाहेर पर्यटक या काळात पर्यटनासाठी येत असल्याचे या कृषी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे एप्रिल व मे या कालावधीत महोत्सव भरविण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी एप्रिलमध्ये कृषी विभागाकडे केली होती. त्यास जून महिन्यात मान्यता मिळाली आहे. हंगाम संपल्यानंतर महोत्सव भरविण्यास मान्यता दिल्याने आता उत्पादकांना आणि ग्राहकांना पुढील एप्रिल आणि मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

Agri Power Supply Issue: शेतीसाठी सलग सहा तास वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Cattle Conservation: गोवंश संवर्धनाचा भार शेतकरी-गोपालकांवर पडू नये; खासदार मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा

Fake Recruitment Case: बोगस भरती प्रकरणी आत्मा प्रकल्प संचालकाला अटक

Pune APMC National Status: पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा द्या; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT