Devendra Fadnvis Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी

Nar-Par Girna Interlinking Project : काहीच दिवसांपूर्वी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली होती.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला काहीच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे. याबाबत फडणवीस यांनी ट्विट करून माहिती शनिवारी (ता.१०) दिली. दरम्यान मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पाणी नेण्यात येईल. यासाठी राज्यातील महायुती सरकारने नदीजोड प्रकल्पाला हाती घेतल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

फडणवीस यांनी, उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा असणाऱ्या नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. तर हा प्रकल्प महत्वाचा असून गेल्या ५० ते ६० वर्षापासून चर्चत आणि प्रतिक्षेत आहे. पण आता राज्यपालांनी वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्याबद्दल राज्यपालांचे मनापासून आभार मानत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच फडणवीस यांनी, नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पातून गिरणा पश्चिमी वाहिन्या नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला मिळेल. तर याचा थेट लाभ दोन्ही जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला होईल. तर हा प्रकल्प सुमारे ७०१५ कोटी रुपयांचा असून तो राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित असून यामधून २६०.३० दलघमी पाणी ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे उपसा केला जाणार आहे. तर उपसा करण्यात आलेले पाणी चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचा प्रस्ताव आहे. तसेच यासाठी ७९.९२ कि.मी. लांबीची सिंचन योजना प्रस्तावित आहे. ही योजना झाल्यास नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतील अनेक गावांना लाभ मिळेल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT