Fishing Agrowon
ॲग्रो विशेष

Fishing Ban : चौपन मासे पकडण्यासह खरेदी-विक्रीवर निर्बंध

Fisheries Department : शासनाने छोटे मासे पकडण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. माशांचे आकारमान निश्‍चित करून त्यांच्या पकडण्यापासून ते खरेदी विक्रीपर्यंत राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : पापलेट हा राज्य मासा म्हणून घोषित केल्यानंतर ५४ माशांचे आकारमान निश्‍चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासे पकडण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. याच्या फायद्या-तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र शासन निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोकणातील समुद्रकिनारी जिल्ह्यात मत्स्य विभाग सज्ज झाला आहे. सुरवातीला जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईसह कोकणाला लाभलेल्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात माशांची खरेदी-विक्री होते. परंतु गेल्या काही वर्षांत छोट्या आकाराचे मासे मारले जाऊ लागल्यामुळे काही माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने छोटे मासे पकडण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. माशांचे आकारमान निश्‍चित करून त्यांच्या पकडण्यापासून ते खरेदी विक्रीपर्यंत राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. शेवंड, म्हाकुळ, कोळंबीच्या काही प्रजाती, शार्क, करकटा बांगडा, हलवा, तारली, मांदेली, पापलेट, गेदर, बोंबील, धोमा, घोळ, लेप अशा ५४ प्रकारच्या मासळीच्या किमान कायदेशीर आकारमानाची शिफारस करण्यात आली आहे. निश्‍चित केलेल्या आकरामानापेक्षा आकाराने लहान असलेला मासा पकडता येणार नाही. त्याशिवाय त्याची खरेदी-विक्री करता येणार नाही.

व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या मासळीचे कमी होत जाणारे उत्पादन आणि भविष्यात या मासळीची उपलब्धता यांचा विचार करून, हे मासे ज्या आकारमानाला प्रजननक्षम होतात त्याचा अभ्यास करूनच, ही शिफारस करण्यात आली आहे. त्यापेक्षा लहान आकारमानाचे मासे प्रजननक्षम होण्याआधीच पकडले, तर त्यांना अंडी घालण्याची संधी न मिळाल्याने, त्यांची पुढची पिढी जन्माला येऊ न शकल्याने, भविष्यात हे मासे मिळू शकणार नाहीत.
- प्रा. स्वप्नजा मोहिते, मत्स्य तज्ज्ञ, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी
माशांचा शाश्‍वत साठा निर्मितीसाठी शासनाचा प्रयत्न आहे. याचा फायदा भविष्यात मासेमारांनाच होईल. त्यामुळे आकारमान निश्‍चित केलेल्या माशांची माहिती व फोटो प्रत्येक बोटीवर दिला जाईल. त्याद्वारे प्रबोधन करण्यात येईल.
- अभय शिंदे, सहायक मत्स्य आयुक्त

आकारमान निश्‍चित केलेल्या माशांमध्ये सुरमई ३७० मिमी, बांगडा १४० मिमी, सरंगा १७० मिमी, तारली १०० मिमी, सिल्व्हर पापलेट १३५ मिमी, चायनीज पापलेट १४० मिमी, भारतीय म्हाकूळ १०० मिमी, झिंगा कोळंबी ९० मिमी, मांदेली ११५ मिमी, मुंबई बोंबील १८० मिमी, खेकडा ५० ते ९० यासह घोळ, मांदेली, राणी, सौंदाळा, ढोमा, प्रजाती मिळून ५४ प्रजातींचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Scam: कांदा खरेदीतील आर्थिक गैरव्यवहारामुळे ‘नाफेड गो बॅक’

Pune ZP: जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Ranbhaji Takla Modak: रानभाजी ‘टाकळा’पासून मोदक निर्मिती

Crop Insurance: नवीन पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प

Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार

SCROLL FOR NEXT