Sindhudurg News : बदलते वातावरण आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आला असून आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पाठबळ देण्यासाठी राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देत ठोस पावले उचलावीत असा सूर येथील चर्चासत्रात बागायतदारांमध्ये उमटला.
देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी आंबा पिकांच्या सद्यःस्थितीबाबत एकत्र येथे चर्चा केली. या चर्चासत्राला फळ बागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रूमडे, रामदास अनभवणे, चंद्रकात गोईम, नाना गोडे, बबन गोडे, सत्यवान गावकर, सुधाकर वाळके, इंद्रनील कर्वे, संकेत लब्दे, संजय धुरी, गुरूनाथ राणे आदी उपस्थित होते.
देवगड तालुक्यातील आंब्याला या वर्षी फुलकिडीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. फुलकिड नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही कीटकनाशक प्रभावशाली ठरलेले नाही. त्यामुळे आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे १५ जानेवारीला अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत बागायतदारांनी खरेदी केलेल्या कीटकनाशकांची बिले घेऊ नयेत असा निर्णय झाला होता.
त्यासंदर्भात कोणत्याही सकारात्मक हालचाली अजूनही दिसत नाहीत. रोखीने खरेदी केलेल्या बागायतदारांची रक्कम देखील परत मिळालेली नाही. सर्व बाजूंनी आंबा बागायतदार संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात राज्य शासनाने आंबा बागायतदारांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत बागायतदारांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले.
पीक विम्याच्या निकषात बदल आवश्यक
आंबा पिकाबद्दल असलेले पीक विम्याचे निकष हे सदोष आहेत. त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहेत. पीक विम्याच्या जोखीम कालावधीत देखील होणे गरजेचे आहे. पाऊस, उष्णता याबाबतीतही बदल आवश्यक असल्याचे मत अध्यक्ष विलास रूमडे यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.