Mango Blossoms : आंब्याच्या मोहराने रानमाळ दरवळला

Climate Change Effects : दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी व वातावरणातील बदलाचा परिणाम हंगामी पिकांवर होतो
Mango
MangoAgrowon
Published on
Updated on

Vikramgad News : दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी व वातावरणातील बदलाचा परिणाम हंगामी पिकांवर होतो. यावर्षी अवकाळी पाऊस झाला असला तरी चांगल्या थंडीमुळे झाडांना मोहर येण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.

यंदा आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर आला आहे. ७० ते ८० टक्के आंबा झाडांना समाधानकारक मोहोर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.विक्रमगड परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आंबा पीक बागायतदार शेतकरी घेतात.

Mango
Mango Production : दर्जेदार आंबा उत्पादनात सातत्य

गेल्या सात ते आठ वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे दिसून येते. काही भागात मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर आला असला तरीही नैसर्गिक वातावरणातील बदलांमुळे तो करपून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

सध्या आंब्यांच्या झाडांना उशिराने मोठ्या प्रमाणात मोहर आला, तरी हवामानातील बदल व काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाले तर त्याचा परिणाम आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे बागायतदार सचिन ठाकरे यांनी सांगितले.

Mango
Hapus Mango : हापूसचा आंतरराष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न आवश्यक
यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याने व आंबा पिकाला पोषक वातावरण तयार झाल्याने मोहर आला आहे. ढगाळ वातावरण झाले तर हा मोहोर करपण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश्वर जाधव, आंबा बागायतदार
यावर्षी अनेक आंब्याच्या झाडांना चांगला मोहर आला आहे. चांगले वातावरण राहिले, तर यंदा चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे.
विजय सांबरे, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com