Solapur News : सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्ती (एजंट) यांच्याकडून पैशाची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तत्काळ तक्रार करता यावी, यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात दर्शनी भागात क्यू आर (QR)कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे.
संबंधित नागरिकांनी हा कोड स्कॅन करून तक्रार नोंदविण्याची सुविधा दिली आहे. यावरील तक्रारीची तत्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार आहे. सर्व सीएससी सेंटर तसेच सेतू कार्यालय, तहसील कार्यालय आणि प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत.
यामध्ये केंद्रचालकांनी दाखल्या साठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम मागणी केल्यास, दाखला विहीत मुदतीत दिला नाही अथवा विलंब केला तर, दाखल्या संदर्भात संबंधिताला एसएमएस व्दारे माहिती न दिल्यास, एजंटाद्वारे संबंधित नागरिकांकडे अधिकचे पैसे मागणी केल्यास अशा कोणत्याहीप्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी यावर दिलेला क्यु आर. कोड स्कॅन केल्यास त्यावर तत्काळ आपली तक्रार नोंदविली जाते.
तसेच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे नागरिकांना कोणाला भेटण्याची अथवा अधिकचे पैसे देण्याची गरज राहणार नाही. जिल्हा प्रशासनाने क्यू आर. कोड स्कॅन करून तक्रार नोंदवणीच्या दिलेल्या अद्ययावत सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
क्यूआर कोडवर आठ तक्रारी कोणत्याही मोबाईल ॲपवरून हा क्यु आर कोड स्कॅन करून नागरिकांना तक्रार नोंदविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत एकूण ८ तक्रारी नोंदविल्या गेलेल्या आहेत. या तक्रारीमधील एका तक्रारीबाबत अर्जदारांना कळवणेत आले आहे. उर्वरित प्रकरणांबाबत चौकशी अहवाल प्राप्त करून तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.-कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.