Pune News : केंद्र सरकारचे सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) (PG Portal) आणि राज्य सरकारचे आपले सरकार प्रणाली एकत्र करून आपले सरकार २.० पोर्टल सुरू करण्यात आले होते. या पोर्टलद्वारे नागरिकांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र केंद्र आणि राज्य सरकारची एकच प्रणाली १९ सप्टेंबर २०२३ ला करण्यात आल्याने २२७१ प्रलंबित तक्रारींपैकी १३९ तक्रारी निकाली निघालेल्या नाहीत. यामुळे ०२ मे ते १५ मे २०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश काढत या तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत विभागाने १२ एप्रिल २०२४ रोजी शासन आदेश काढला आहे.
केंद्र सरकारचे सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) (PG Portal) आणि राज्य सरकारचे आपले सरकार प्रणाली १९ सप्टेंबर २०२३ रोजी एकत्र करण्यात आली होती. तसेच राज्यात आपले सरकार २.० पोर्टल सुरू करण्यात आले होते. या पोर्टलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना दिला जातो.
तसेच काही तक्रारी असल्यास त्या स्विकारल्या जातात. मात्र १९ सप्टेंबर २०२३ नंतर यात बदल करण्यात आल्याने मागील तक्रारी निकाली काढण्यात अडचणी आल्या होत्या. याच १३९ तक्रारी निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम आखण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते.
विशेष मोहीमेतंर्गत तक्रारींचे निवारण करणाऱ्या विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी गोपनिय अहवाल द्यावा असेही सांगण्यात आले होते. तर याची माहिती मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या शासकीय एक्स समाजमाध्यमावर देण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. मात्र १९ सप्टेंबर २०२३ च्या आधीच्या तक्रारींवर कार्यवाही झालेली नाही. यामुळे विभागाने हा आदेश काढला आहे.
या आदेशात २२७१ तक्रारी संबंधित विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले असून यापैकी १३९ तक्रारी पुन्हा विभागांकडे पाठवण्यात आल्या होत्या. मात्र यावर कोणतेच काम झाले नसल्याने आता थेट सबंधित विभागांनाच आदेश काढण्यात आले आहेत. या विभागांना त्या तक्रारी निकाली काढा अशा सूचना करताना, त्या आपल्याशी निगडीत नसतील तर ज्या विभागाशी निगडीत आहेत त्यांना हस्तांतरित करा. ती परत न पाठवता निकाली काढा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तर या तक्रारी निकाली काढताना सामान्य प्रशासन विभागातील र.व.का प्रमाणे काढावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
याचबरोबर तक्रार निकाली काढताना काही अडचण आल्यास एनआयसी/आयटी विभागाशी संपर्क करावा. तसेच तक्रारी निकाली काढव्यात असेही कळवण्यात आले आहे. तसेच या विशेष मोहीमेनंतर याबाबत २१ मे आणि २९ मे २०२४ ला अप्पर मुख्य सचिव (प्र.सु.र.व.का) यांच्या अध्यक्षतेखाली विभागांचा आढावा घेतला जाणार आहे. यामुळे रखडलेल्या १३९ तक्रारींचा लवकरच निपटारा होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.