Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farmers : भातपीक शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा

PM Kisan Crop Insurance : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Mumbai News : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे, तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, तसेच गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे.

कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भातपिकाकरिता पीक विमा काढण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ देण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२४ पीक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भातपिकाकरिता पीक विमा उतरविता येणार आहे. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. भातपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ५१,७६० रुपये प्रति हेक्टर आहे. ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीअंतर्गत पीक नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखमीअंतर्गत निश्चित होणारी भरपाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील अटी व शर्तींनुसार निश्चित केली जाणार आहे.

पोर्टल, ॲपसह सेवा उपलब्ध

पीक विमा पोर्टल, विमा कंपनी, बँक सहकारी पतसंस्था, पीक विमा ॲप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकांमधील गर्दी टाळावी, याकरिता जन सुविधा केंद्रांमार्फत (सीएससी सेंटर) ऑनलाइन पद्धतीने पीकविमा अर्ज दाखल करता येणार आहे. शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुरुड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT