Farmer Accident Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accident Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान वाटपास मान्यता

Farmer Insurance : राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाते. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास अनुदान देण्यात येते.

Dhananjay Sanap

Gopeenath Munde’s Farmer Accident Scheme : २०२४-२५ या वर्षातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील मंजूर प्रस्तावासाठी ४० कोटी एक लाख ३२ हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने निधी वितरित करण्याबाबत मंगळवारी (ता.१८) शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाते. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास अनुदान देण्यात येते. राज्यात २०१५-१६ पर्यंत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात राबवण्यात आली. परंतु योजनेत अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे राज्य सरकारने २०२३ पासून सानुग्रह अनुदान तत्वावर योजना राबण्याचा निर्णय घेतला.

शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणं तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळं होणाऱ्या अपघातामुळं शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येतं. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त कुटुंबांचं उत्पन्नाचं साधन बंद होऊ नये, यासाठी योजना राबवली जाते.

राज्य सरकारने यापूर्वी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधील ३० कोटी रुपयांच्या निधी वितरणास ९ सप्टेंबर रोजी मान्यता दिली होती. आता अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उर्वरित रक्कम वितरणास मान्यता दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT