Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : पन्हाळा तालुक्यात भाताची चांगली वाढ

Paddy Farming : दरवर्षीपेक्षा या वर्षातील पाऊसमान चांगले राहिल्याने भातासह भुईमूग, सोयाबीन, ज्वारी आणि ऊसपिकांची परिस्थिती चांगली दिसत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : दरवर्षीपेक्षा या वर्षातील पाऊसमान चांगले राहिल्याने भातासह भुईमूग, सोयाबीन, ज्वारी आणि ऊसपिकांची परिस्थिती चांगली दिसत आहे.

विशेषतः पाऊस हंगामानुसार वेळेवर झाल्याने आणि पिकांना उन्हाच्या झळा न लागल्याने समाधानकारक पिके असल्याच्या बोरपाडळे, मोहरे, माले, मिठारवाडी, काखे आदी गावांतील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

विशेषत: भाताचे पिक जोमात असून हवामानाच्या पूर्व अनुमानानुसार शेतकऱ्यांनी भात पिकावर भर दिला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी संकरित, आधुनिक तसेच कमी कालावधीच्या भाताच्या वाणावर भर दिला आहे.

मोहरे, शहापूर, माले आणि काखे पाणी सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रावर म्हणजे २५ जूनला भाताची पेरणी साधली होती. बऱ्याच ठिकाणचे भाताचे पीक पोटरीतून बाहेर पडले आहे, तर काही ठिकाणी बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

पावसाचा, हवामानाचा अंदाज खरा ठरल्याने सर्वच पिकांची स्थिती चांगली असून खास करून भाताचे उत्पन्न यावर्षी वाढेल, अशी अपेक्षा बोरपाडळे परिसरातील शेतकऱ्यांना आहे.

टोळ, तुडतुडे तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असला तरी भात उत्पादन दरवर्षीपेक्षाचांगले होईल अशी आशा वाटते.
- शामराव आमकर, महादेवनगर, माले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

Kharif Season Planning: निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा : पालकमंत्री फुंडकर

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

SCROLL FOR NEXT