Paddy Crop : पावसाच्या सरींनी हिरवी भातपिके डोलू लागली

Paddy Farming : यंदा पाऊस जूनच्या पंधरवड्यानंतर सुरू झाल्याने लावणीलादेखील विलंब झाला होता, परंतु पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
Paddy
PaddyAgrowon
Published on
Updated on

Vikramgad / Kasa News : यंदा पाऊस जूनच्या पंधरवड्यानंतर सुरू झाल्याने लावणीलादेखील विलंब झाला होता, परंतु पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पेरण्यांची कामे व आता बघता बघता लागवडीचे कामेही संपुष्टात आली आहेत.

ऑगस्टच्या दुसरा आठवड्यात पावसाने दडी मारली, परंतु गेल्या आठवड्यापासून अधून-मधून श्रावणसरींनी आता केलेल्या लावणीचे रोपे रुजू लागल्याचे चित्र विक्रमगड तालुक्यात दिसत आहे.

नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमीनंतर गेल्या दोन दिवसांत पावसाची अधून-मधून सर येत आहे. पावसाने यंदा भातपिक उत्तम होईल, अशी आशा शेतकऱ्यांना झाली असल्याने ते समानधान व्यक्त करीत आहे. या वर्षी पावसावर विश्वास न बसता रोहिणीच्या प्रारंभालाच पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामांना प्रारंभ केला होता.

Paddy
Paddy Farming : जुन्नर तालुक्यात भात लागवडीच्या चारसूत्री पद्धतीत वाढ

त्यानंतर पावसाचा अनियमितपणामुळे पुढील पेरण्या उशिराने झाल्या. मात्र गेल्या दोन दिवसांत पावसाची सर अधून मधून येत आहे. जूनचा शेवटचा आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस व भातलावणीचा कालावधी असल्याने उर्वरीत पेरण्यांची कामे शेतकऱ्यांनी आटपती घेतली.

Paddy
Paddy Crop Crisis : करप्यामुळे सिंधुदुर्गातील भातपीक संकटात

विकमगड तालुक्यात एकूण ९४ गाव-पाड्यांत सात हजार ५५७ हेक्टर क्षेत्रामध्ये भातपीक घेतले जाते. त्यासाठी सुधारित भात बियाणांची लागवड केली आहे. आता पावसाचा जोर कायम राहिल्याने रुजलेल्या भाताच्या रोपांच्या हिरवळीने डोळे दिपून जात आहेत.

यंदा बऱ्यापैकी पाऊस होत असून सर्वत्र लागवड केलेली रोपे रुजून त्यांना काही दिवसांत फुटवे येण्यास सुरुवात होईल. यंदा काही अपवाद वगळता चांगले उत्पादन हाती लागेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

हळवे भातपीक

हळव्या भातपिकांमध्ये रत्ना, गुजरात-४, कर्जत-३ ही भातपिकांची वाण मोडली जाते. या भातपिकांची लागवड केल्यास हे पीक पेरणीपासून शंभर दिवसांत कापणीसाठी तयार होते.

निमगरवे भातपीक

निमगरव्या पिकांमध्ये गुजरात-११, गुजरात-१७ ही भाताची वाण मोडली जातात. या भातपिकांची लागवड केल्यास पेरणीपासून हे पीक १२५ ते १३० दिवसांत कापणीसाठी तयार होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com