Satej Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk : ‘गोकुळ’ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल

MLA Satej Patil : गोकुळ संघाचे दूध संकलन प्रतिदिनी १७ लाख लिटरपर्यंत पोहोचले असून गोकुळ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

Team Agrowon

Kolhapur News : गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे. या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत. सध्या संघाचे दूध संकलन प्रतिदिनी १७ लाख लिटरपर्यंत पोहोचले असून गोकुळ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे.

या म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजीराजे सहकारी दूध संस्था व कामधेनू महिला दूध संस्था भुयेवाडी (ता. करवीर) या संस्थेच्या दूध उत्पादकांनी वीरशैव बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या ३२ म्हशी हरियाना व वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून खरेदी केलेल्या म्हशी भुयेवाडी (ता. करवीर) येथे आमदार पाटील व गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते दूध उत्पादकांना प्रदान करण्यात आल्या.

पाटील म्हणाले की, दूध उत्पादकांना म्हैस खरेदीसाठी ४० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Agri Exhibition: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन नऊ जानेवारीपासून

Mango Season: हापूस यंदा एकाच टप्प्यात

Pomegranate Export: डाळिंब निर्यातीला प्रोत्साहन देणार : पणनमंत्री रावल

Maize Production: रब्बीत मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ

Bangladesh Rice Procurement: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

SCROLL FOR NEXT