Milk Purchase : ग्रामीण भागात दुधाची खरेदी चक्क किलोत

Milk Dairy : सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दूध डेअऱ्यांकडून दूध किलोमध्ये विकत घेतले जात असल्याने शेतकऱ्यांनी बसवलेली घडी विस्कटत चालली.
Milk
MilkAgrowon
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दूध डेअऱ्यांकडून दूध किलोमध्ये विकत घेतले जात असल्याने शेतकऱ्यांनी बसवलेली घडी विस्कटत चालली. मात्र डेअरीकडून दूध विक्री मात्र लीटरमध्ये केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. अशा प्रकारे सुरू असलेल्या लुटीकडे कोणीही बघायला तयार नसल्यामुळे दूध डेअरीवाल्यांचे फावत चालले आहे.

दूध डेअरीवाल्यांकडुन फॅटवर शेतकऱ्यांना दुधाचा दर दिला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या दुधातील थोडे दूध घेऊन फॅट मोजले जाते. त्या फॅटवर ते दर देतात. अगोदरच किलोमध्ये दूध घेताना दूध जास्त जाते. त्यात आणखी फॅट मोजण्यासठी दूध घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यामध्येही ४० ते ५० मिलीचा झटका बसतो.

Milk
Milk Subsidy : दूध अनुदानाची फक्त घोषणा; शासन आदेश काढला नाहीच!

किलो आणि लीटरमधील फरक

अलीकडे काही दूध डेअरीवाल्यांकडून विशेषतः ग्रामीण भागातील दूध डेअरीवाल्यांकडुन दुधाची खरेदी किलोमध्ये केली जात आहे. त्यामुळे एका किलोतून सुमारे २० ते ४० मिली दूध डेअरीला जास्त जाते. जेवढे दूध असेल तेवढा फरक या पटीत पडत जातो. त्यामुळे त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो.

काही सहकारी आणि खासगी दूध संघ, डेअऱ्यांकडून दुधाची खरेदी अलीकडे किलोमध्ये केली

जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अगोदरच तोटा सहन करावा लागत आहे. मात्र त्या सहकारी आणि खासगी दूध डेअऱ्या आणि संघाकडून केलेल्या दुधाची विक्री मात्र ते किलोत न करता

लीटरमध्ये करतात. त्यामुळे त्यांना त्यामध्ये तोटा सोसावा लागत नाही.

Milk
Milk Subsidy : खासगी प्रकल्पांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५ रुपये अनुदान द्या

सातारा जिल्ह्यातील दूध संकलन स्थिती

गायीचे दूध संकलन - १८ लाख १३ हजार ५०० लीटर

म्हशीचे दूध संकलन - तीन लाख १६ हजार ९००

एकूण दूध संकलन - २१ लाख ३० हजार ४०० लीटर

दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा येथे दुधाची खरेदी आणि विक्रीही किलोतच केली जाते. महाराष्ट्रात मात्र किलोत दूध घेतले जाते आणि लीटरमध्ये विक्री केली जाते. १०० किलो दूध घेतले की सुमारे १० लीटरचा फायदा डेअरींना होतो आणि शेतकऱ्यांना तेवढा तोटा सोसावा लागतो. त्याविरोधात आम्ही आंदोलन करूनही शेतकऱ्यांच्या लुटीकडे शासन बघायला तयार नाही. याविरोधात आम्ही पुन्हा आवाज उठवणार आहोत. - पंजाबराव पाटील, केंद्रीय अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com