Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : कार्यक्षेत्राबाहेरील गाईच्या दुधाला ‘गोकुळ’ देणार ३० रुपये लिटर दर

Gokul Doodh Sangh : कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर प्रति लिटर ३० रुपये करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ)घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरूण डोंगले यांनी दिली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर प्रति लिटर ३० रुपये करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ)घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरूण डोंगले यांनी दिली. शासनाच्या प्रति लिटर पाच रुपये अनुदान पात्रतेसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती श्री. डोंगळे यांनी दिली.

जागतिक बाजारपेठेत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रामध्ये खासगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपयांपर्यंत कमी झाले होते. म्हणून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच गाय दूध खरेदीसाठी १ जुलै २०२४ पासून प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले.

परंतु या अनुदानास पात्र होण्यासाठी प्रतिलिटर किमान ३० रुपये दर देण्याची अट आहे. सध्या ‘गोकुळ’ मार्फत जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३३ रुपये, तर जिल्ह्याबाहेरील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर २८.५० रुपये दर दिला जात आहे.

शासनाच्या गाय दूध अनुदानास पात्र होण्यासाठी यापूर्वी कार्यक्षेत्राबाहेरील कमी केलेल्या दरात वाढ करून गाय दूध खरेदीचा दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ गुणप्रतिस प्रतिलिटर ३० रुपये इतका करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्‍या मिटिंगमध्‍ये घेण्‍यात आला असून या निर्णयाचा फायदा गोकुळच्या सांगली, सोलापूर, कर्नाटक, कोकण येथील गाय दूध उत्पादकांना होणार आहे.

तथापि, जिल्ह्यातील गाय दूध खरेदी दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती श्री. डोंगळे यांनी दिली. सध्या ‘गोकुळ’ चे कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध संकलन प्रतिदिन सुमारे दोन लाख लिटर्स इतके असून या दर वाढीमुळे ‘गोकुळ’च्या कार्यक्षेत्राबाहेरील ३५ हजार गाय दूध उत्पादकांना फायदा होणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT