Gokul Milk Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Rate : गोकुळ दूध संघाकडून म्हैस आणि गाय खरेदी आणि विक्री दूध दरात वाढ होण्याची शक्यता

Gokul Milk Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघ 'गोकुळ'ने गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ होणार आहे. गाय आणि म्हैस खरेदी आणि विक्री दरातही वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघ 'गोकुळ'ने गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ होणार आहे. गाय आणि म्हैस खरेदी आणि विक्री दरातही वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे म्हणाले की, बैठक झाली आहे, यामध्ये दूध खरेदी आणि विक्री दराबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले परंतु यावर अद्याप अंतीम निर्णय झाला नसल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.

दरम्यान मागच्या आठवड्यात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये झालेल्या बैठकीत दुधाच्या विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गोकुळ दूध संघ हा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. दूध संघांनी ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ. साठी प्रतिलिटर २८ रुपयांपर्यंत दर आणला होता. त्यामुळे दूध उत्पादकांची कोंडी झाली होती.

आगामी काळात दुधाची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेऊन राज्यातील दूध संघांकडून प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गोकुळ दूध संघाकडून २ रूपयांची खरेदी आणि विक्री दरात वाढ केल्याने गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ. साठी ३२, तर म्हशीच्या ६.० फॅट व ९.० एस. एन. एफ. साठी ५२.५० रुपये मिळू शकणार आहे. 'गोकुळ'ने ऑगस्ट २०२३ पासून प्रतिलिटर ७ रुपयांची कपात केली होती.

गोकुळच्या सभसदांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प

गोकूळ दूध संघाच्या वतीने करमाळ्यातील या सौर प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये खर्च केला आहे. या प्रकल्पातून दैनंदिन साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या विजेमुळे गोकुळ दूध संघाची महिन्याकाठी सुमारे ५० लाख रुपयांच्या विजेची बचत होणार आहे, याचा फायदा थेट गोकुळच्या सभासदांना होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) यांचा ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगॅावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी येथे स्वमालकीच्या १८ एकर जागेवर कार्यान्वित करण्यात आला असून, दूध संघाच्या ६२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नारायण पाटील, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व गोकुळचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरविणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

Dairy Farming: पशुपालनात दैनंदिन व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT