Agriculture Roads
Agriculture RoadsAgrowon

Pune Rural Development: शेतकऱ्यांना दिलासा! पुणे जिल्ह्यातील १४६ किमी पाणंद रस्ते मोकळे

Agriculture Road: पिढ्यान्‌पिढ्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेले पाणंद रस्त्यांचे अडथळे महसूल प्रशासनाने दूर केले आहेत. सरकारच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील १४६ किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी जाणे आणि शेतीमालाची वाहतूक करणे अधिक सुलभ झाले आहे.
Published on

Pune News: पिढ्यान्‌पिढ्या शेतीच्या अडवून ठेवलेल्या रस्‍त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सरकारच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४६ किलोमीटरच्या रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुढाकार घेत, सर्व तहसीलदार आणि तलाठ्यांना पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ब्रिटिशकाळात पारंपरिक वहिवाटीचे रस्ते नकाशावर नव्हते. ते रस्ते आता नकाशावर आणण्यात आले आहे. यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात अवजारे घेऊन जाणे, शेतीमालाची वाहतूक करणे सोपे झाले आहे. पूर्वी पारंपरिक वादांमुळे शेतकरी एकमेकांना रस्ते देत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कुचंबणा होत होती.

Agriculture Roads
Farm Road : शेकडो शेतकऱ्यांची पाणंद वाट मोकळी

मात्र आता प्रत्येक शेताला आणि शेतकऱ्यांना रस्ता देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. यानुसार आता पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी (कुळकायदा) नामदेव टिळेकर यांनी देखील पाणंद रस्ते मुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

रस्त्यांचे पारंपरिक वाद, तक्रारी प्रलंबित होत्या या तक्रारी निवारणांसाठीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण जिल्हाधिकारी डुडी यांनी करत, तहसीलदारांचे अधिकार नायब तहसीलदारांना दिले. यामुळे वाद मिटविण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात काही दिवसांतच सुमारे १४६ किलोमीटर रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.

Agriculture Roads
Rural Roads Development: पुण्यात पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांना बसणार लगाम!

मोकळे झालेले पाणंद रस्ते

तालुका रस्त्यांची संख्या लांबी (किमी.)

आंबेगाव ४ ४.४३

खेड १२ २१

जुन्नर ८ ८

दौंड ५ ५.८

बारामती १० ६.३

भोर ८ ९

मावळ १४ २३.८

मुळशी ८ ८

शिरूर १५ ३७

लोणी काळभोर ६ ३

हवेली ३ ३

वेल्हे ३ ३.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com