Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : 'राज्य सरकारच्या जाचक अटींमुळे दूध संस्थांनी बदलाला सामोरे जावे'

Arun Dongle : राज्य शासन गायीच्या अनुदानाच्या अटीबाबत ठाम राहिले तर प्रकिया क्लिष्ट होणार असून, संस्थांनी नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे अरूण डोंगळे म्हणाले

sandeep Shirguppe

Maharashtra Cow Milk Rate : राज्य शासनाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले असले तरी संस्थांच्या माध्यमातून ते उत्पादकांना द्यावे लागेल, जाचक अटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

मात्र, शासन ठाम राहिले तर प्रकिया क्लिष्ट होणार असून, संस्थांनी नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे अवाहन 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. ते घोटवडे येथे राधानगरी तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी व सचिवांच्या मेळाव्यात बोलत होते.

डोंगळे म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अनुदानासाठी पाठपुरावा केला. शासनाने गायीच्या दुधाला थेट उत्पादकांना अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, यासाठी कॅशलेस व्यवहारासह आधार कार्ड व मोबाईल लिंकिंगची अट घातली आहे.

जनावरांच्या टॅगिंगचीही अट आहे. डोंगराळ व दुर्गम भागात तर १०० रुपयांसाठी दहा किलोमीटरची पायपीट करून बँकेकडे जावे लागणार आहे. मात्र, शासनाला यंत्रणा उभी करायची आहे.

दूध संस्था व उत्पादकांनी या बदलाला सकारात्मक सहकार्य करावे लागणार असल्याचे मत डोंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक अभिजित तायशेटे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांची भाषणे झाले.

यावेळी बिद्रीचे संचालक राजेंद्र मोरे, राजेंद्र चौगले, दत्तात्रय डवरी, सतीश पोवार, सुनील वाडकर यांचा सत्कार डोंगळे यांच्या हस्ते झाला, डॉ. उदय मोंगले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. द. पाटील, शरद तुरंबेकर, डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ. अशोक गायकवाड उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT