Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh Kolhapur : गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; ११३ कोटी ६६ लाख रुपयांचा दूध फरक देणार

sandeep Shirguppe

Gokul Dudh Sangh Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी ११३ कोटी ६६ लाख रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधाला २ रुपये २५ पैसे व गाय दुधाला प्रतिलिटर १ रुपया २५ पैसे अंतिम दूधदर फरक देण्यात आला आहे. दूध उत्पादकांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवार (ता.०८) माहिती दिली सांगितले.

डोंगळे म्हणाले की, 'गोकुळ' तर्फे दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित केला जातो. तो पुढील सणासुदीच्यावेळी दिला जातो. गतवर्षपेक्षा दूध उत्पादकांना यावर्षी १२ कोटी ३२ लाख रुपये जादा फरक मिळणार आहे. संस्थांच्या बँकेतील खात्यावर शुक्रवारी (ता. ११) हा फरक जमा होणार आहे.

डोंगळे पुढे म्हणाले की, यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता ५८ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपये, तर गाय दुधाकरिता ३४ कोटी ७० लाख ९३ हजार रुपये इतका दूधदर फरक जाहीर केला आहे. दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी २० लाख ३५ हजार व डिंबेचर व्याज ७.७० टक्के प्रमाणे ८ कोटी ९६ लाख ६६ हजार रुपये आहे.

शेअर्स भांडवलावरती ११ टक्के प्रमाणे लाभांश आठ कोटी १६ लाख ८९ हजार रुपये असे एकूण ११३ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाईल. दर फरकाचा लाभ जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील सात हजार ९२७ दूध संस्थांच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांना होईल अशी माहिती डोंगळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT