वैभव जाधव, डॉ. राजेश क्षीरसागर
Effective Remedy for Malnutrition : तांदूळ हा भारतीय लोकांच्या आहारातील घटक आहे. लाखो कुटुंबांच्या रोजच्या आहाराचा भाग असूनही, देशातील अनेक भागांमध्ये कुपोषणाची समस्या गंभीर आहे. यामुळे शरीरातील लोह, जीवनसत्त्व बी-१२, फॉलिक अॅसिड यासारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता होते, ज्याचा शरीराच्या विकास, प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.या समस्येवर उपाय म्हणून सरकारने फोर्टिफाइड तांदूळ पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
फोर्टिफाइड तांदूळ पोषणद्रव्यांनी समृद्ध आहे, ज्यात लोह, फॉलिक अॅसिड आणि इतर महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे लोकांच्या आहारातील पोषणद्रव्यांची कमतरता दूर होऊन कुपोषण कमी करण्यास मदत होते. फोर्टिफाइड तांदळामध्ये अतिरिक्त पोषक घटक असतात. हा तांदूळ दिसायला आणि चवीला सामान्य तांदळासारखाच असतो, मात्र त्याच्या पोषणमूल्यांमध्ये फरक असतो. सामान्य तांदळाच्या पॉलिशिंग प्रक्रियेत पोषक घटक नष्ट होतात, मात्र फोर्टिफाइड तांदळात लोह, फॉलिक अॅसिड, आणि इतर पोषक घटक पुरेशा प्रमाणात आहेत.
मुख्य पोषक घटक
लोह ः शरीरात रक्तनिर्मितीसाठी महत्त्वाचा घटक.
फॉलिक अॅसिड नव्या पेशींची निर्मिती आणि वाढीसाठी आवश्यक.
जीवनसत्त्व बी-१२ ः ऊर्जा निर्मिती आणि मानसिक आरोग्यासाठी.
झिंक आणि जीवनसत्त्व-अ: रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे.
एफएसएसएआय मानके
पोषक घटक प्रति किलोमध्ये फोर्टिफिकेशनचे प्रमाण
लोह २८-४२ मिग्रॅ
फॉलिक अॅसिड ७५-१२० मायक्रोग्रॅम
जीवनसत्त्व बी-१२ ०.७५-१.२५ मायक्रोग्रॅम
कुपोषणावरील उपाय
भारतातील कुपोषण ही प्रमुख आरोग्य समस्या आहे. ३८ टक्के मुलांमध्ये ठेंगणेपणा आणि ५८ टक्के महिलांमध्ये अॅनिमिया आढळतो. फोर्टिफाइड तांदूळ कुपोषणाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे मुलांची वाढ आणि एकूण आरोग्य सुधारते.
फोर्टिफाइड तांदूळ हा कुपोषणाशी लढण्याचा प्रभावी मार्ग आहे. भारत सरकार सार्वजनिक वितरण प्रणाली आणि माध्यान्ह भोजन योजनेतून हा तांदूळ पुरवते. लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व बी-१२ आणि इतर पोषक घटकांच्या पलब्धतेमुळे अॅनिमिया आणि कुपोषण कमी करण्यात मदत होते.
फोर्टिफाइड तांदूळ पुरवठा उपक्रम
फोर्टिफाइड तांदूळ हा कुपोषणाशी लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. भारतातील कुपोषणाच्या स्थितीचा विचार करता, या तांदळाच्या वापरामुळे लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व बी-१२, आणि इतर आवश्यक पोषक घटकांची कमतरता भरून काढली जाऊ शकते. सार्वजनिक वितरण प्रणाली, शालेय पोषण आहार योजना, आणि अंगणवाडी केंद्रासारख्या सरकारी योजनांमधून फोर्टिफाइड तांदूळ उपलब्ध करून देणे, हे गरजू लोकांना पोषणद्रव्यांची पूर्तता करण्याचा उत्तम मार्ग ठरतो.
फोर्टिफाइड तांदळाचा नियमित वापर केल्याने लहान मुलांमध्ये अॅनिमियाची समस्या कमी होण्याची शक्यता आहे, तसेच गरोदर स्त्रियांचे आणि स्तनपान करणाऱ्या मातांचे पोषण सुधारेल. या उपक्रमामुळे देशातील कुपोषण कमी होण्यास मदत होईल आणि एकूणच लोकांचे आरोग्य सुधारेल. तथापि, फोर्टिफाइड तांदळासंबंधीची जागरूकता वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून अधिक लोक या तांदळाचा फायदा घेऊ शकतील. त्याचबरोबर, या योजनांचा अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याची गरज आहे. यामुळे कुपोषणाच्या समस्येला सामोरे जाण्याची आणि भारतातील लाखो लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची संधी मिळेल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गरीब कुटुंबांना कमी किमतीत फोर्टिफाइड तांदूळ पुरवला जातो.पोषण अभियानामध्ये कुपोषण कमी करण्यासाठी रेशन दुकानांतून फोर्टिफाइड तांदूळ वाटला जातो.
शालेय पोषण आहार योजना: माध्यान्ह भोजन योजनेतून शाळांमध्ये फोर्टिफाइड तांदूळ पुरवला जातो.
अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि स्तनपान करणाऱ्या मातांना फोर्टिफाइड तांदूळ दिला जातो.
वैभव जाधव, ८३७८९१५३५३
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.