Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : गोव्यातील विक्री केंद्रे खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला, फळे

Ravi Naik : गोवा राज्य सरकारच्या फळे व भाजीपाला विक्री केंद्राला महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला खरेदीसाठी मान्यता देताना, त्यासाठी लवकरच आवश्यक ती लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

Team Agrowon

Solapur News : गोवा राज्य सरकारच्या फळे व भाजीपाला विक्री केंद्राला महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला खरेदीसाठी मान्यता देताना, त्यासाठी लवकरच आवश्यक ती लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

गोवा सरकारच्या वतीने गोव्यातील नागरिकांसाठी भाजीपाला आणि फळे विक्री केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. हा उपक्रम देशात फक्त गोवा राज्यातच राबविला जात आहे. या विक्री केंद्रांना भाजीपाला आणि फळे पुरवण्यासंबंधाने ‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे यांच्यासह प्रकाश भोसले,

शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष जयराम आलदर, दूध संस्थेचे अध्यक्ष भगवानराव चौगुले, माजी सरपंच संतोष वाले आदींनी गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष, आमदार परमेंद्र शेट यांच्यासह कृषिमंत्री नाईक यांच्याशी फळे व भाजीपाला पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा केली.

तसेच त्यातील अडचणीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फळे पुरवठा करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाजीपाला पुरवठा करण्याबाबत या वेळी ठरवण्यात आले. या बैठकीत गोवा कृषी विभागाचे संचालक संदीप देसाई, गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई, व्यवस्थापक प्रसाद परब आदी बैठकीस उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT