Guava  Agrowon
ॲग्रो विशेष

Guava Research : वळती येथे पेरू संशोधन केंद्राचा प्रस्ताव द्या

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरू पिकाची लागवड केली जाते. तसेच इतरही फळपिकांचीही मोठ्या प्रमाणात लागवड आहे. या तालुक्यातील वळती येथे पेरू संशोधन केंद्र व उद्यान विद्या महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

चिखली विधानसभा मतदार संघातील विविध विषयांच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथिगृहावर विविध विभागांच्या उच्चस्तरीय अधिकारांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. आठ) बैठक झाली. या वेळी आमदार श्‍वेता महाले यांनी विविध समस्या, मागण्या सादर केल्या. त्या वेळी फडणवीस यांनी उपरोक्त निर्देश दिले.

चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड आहे. तसेच पेरूसोबत इतरही फळपिके मोठ्या प्रमाणात घेतले जातात. परंतु जिल्ह्यांमध्ये कुठेही संशोधन केंद्र किंवा उद्यानविद्या महाविद्यालय नसल्याने शेतकऱ्यांना फळ पिकांबाबत पाहिजे तशी माहिती मिळत नाही. त्यामुळे चिखली येथील वळतीजवळ पेरू संशोधन केंद्र व उद्यान विद्या महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आमदार महाले यांनी केली होती. त्या अनुषंगाने जागेसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या.

नदीजोड प्रकल्पात ‘पैनगंगा’ समावेशाच्या हालचाली

खडकपूर्णा प्रकल्पाच्या दरवाजांना फ्लॅप लावून उंची वाढविणे, अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करणे, खडकपूर्णा प्रकल्पास सुप्रमा मिळणे, खडकपूर्णा पेनटाकळी प्रकल्प जोडण्याबाबतचा विषय हा पाणी उपलब्धतेबाबत असल्याने वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात ‘पैनगंगा’ नदीजोड प्रकल्पाचा सामावेश झाल्याने प्रकल्प सुरू झाल्यावर सर्व विषय मार्गी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने वैनगंगा नळगंगा नदीवर प्रकल्पात पैनगंगेच्या समावेश करण्याच्या कार्यवाही सुरू झाल्याचे देखील संबंधित विभागाने बैठकीत स्पष्ट केले.

‘शेतकऱ्यांच्या भावना समजून भक्ती मार्गाबाबत कार्यवाही करा’

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव- सिंदखेडराजा या प्रस्तावित भक्ती मार्गासाठी चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यांतील सुपीक जमीन अधिग्रहण होत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभारले असून त्यांच्या भावनेचा विचार करीत या बैठकीत चर्चा झाली. भक्तिमार्ग रद्द करण्याबाबत चर्चा झाल्याने शेतकऱ्यांच्या भावना समजून भक्तिमार्ग रद्द करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या असल्याची माहिती आमदार महाले यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT