Guava Market : थाई पेरूची आवक मंद; दरात मात्र सुधारणा

Thai Guava Market : कळमनासह विदर्भातील काही बाजारांमध्ये सध्या थाई पेरूची आवक ४० ते ५० क्‍विंटलपर्यंत होत असून १५०० ते २५०० रुपयांनी याचे व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
Guava
Guava Agrowon
Published on
Updated on

Vidarbha Fruit Market : कळमनासह विदर्भातील काही बाजारांमध्ये सध्या थाई पेरूची आवक ४० ते ५० क्‍विंटलपर्यंत होत असून १५०० ते २५०० रुपयांनी याचे व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

थाई पेरूचे वैशिष्ट्य म्हणजे याला वर्षातून दोनदा फळधारणा होते. छाटणीवर याचे हंगाम अवलंबून असतात. त्यामुळे छाटणी काटेकोरपणे करावी लागते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या याचा हंगाम सुरू असून उन्हाळ्यात परत याची फळे बाजारात येतात.

जुलैच्या सुरुवातीला १००० ते १५०० रुपये असा दर या पेरूला होता. त्यानंतरच्या काळात सुधारणा होत १५०० ते २५०० रुपयांवर याचे दर पोहोचले. सरासरी ५०० रुपये प्रतिक्‍विंटलची वाढ नोंदविण्यात आली आहे.

एल-४९ मधून निवड पद्धतीने जी-विलास हे वाण विकसित करण्यात आले आहे. याचाही बहर तीनदा घेतला जात होता. मात्र सध्याच्या काळात बाजारात फळे आल्यास अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे याचा नाद सोडला, असे वळती (ता. चिखली, बुलडाणा) येथील शेतकरी मोहन जगताप यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्यात लखनऊ-४९ (एल-४९) या जातीच्या पेरूखालील लागवड क्षेत्र मोठे आहे. जिगाव भागातही पेरूची लागवड होती. मात्र अपेक्षित व्यवस्थापन न केल्याने या बागा आता अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

एल-४९ ला चवीसाठी खवय्याची पसंती राहते. दिवाळी दरम्यान बाजारात हा पेरू विक्रीसाठी येतो, असे पेरू उत्पादक शशी पुंडकर यांनी सांगितले. २५ मेपासून याच्या छाटणीस सुरुवात केली जाते.

८ बाय ८ फूट अंतरावर लागवड केली असल्याने एका एकरात ७५० झाडे होती. त्यातील काही मर्तुक झाल्याने ४५० झाडे शिल्लक आहेत. खारपाणपट्ट्यात बुरशीचा प्रादुर्भाव वाढत झाडे मरतात, असेही पुंडकर यांनी सांगितले.

Guava
Taiwan Guava : तैवान पेरूची लागवड कशी करावी?

एक एकरावर पेरूची लागवड आहे. ३० रुपये प्रतिकिलोने शेगाव येथे थेट विक्री करतो. त्यामुळे चांगला परतावा मिळतो. दरवर्षी विक्रीचा हाच पॅटर्न ठेवला आहे. शेगावमध्ये भाविक मोठ्या संख्येने येतात. त्या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणी स्टॉल लावून पेरू विक्री होते.

- शशी पुंडकर, शेतकरी, येऊलखेड, शेगाव, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com