Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : अनुदानाची कुबडी नको, तर कष्टाचा दर द्या

Team Agrowon

Nirgudsar News : ‘‘आम्हाला अनुदानाची कुबडी नको आहे, तर कष्टाच्या घामाचा दर मिळायला हवा. आम्हाला दुधाला सरसकट ३५ रुपये दर द्यावा. अनुदान देऊन आमची थट्टा करू नये,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रति लिटर दूधदर देऊन अवघे तीन महिने उलटले नाही, तर १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रति लिटर २ रुपयांनी दर कमी करून २ रुपये अनुदानात वाढ करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ प्रति लिटर ३.५ फॅट आणि ८.५ एमएसएफ साठी ३० रुपये दर व राज्य सरकार ५ रुपये अनुदान असे एकूण ३५ रुपये प्रति लिटर दर सरकारने जाहीर केला. हा दर शेतकऱ्यांना १ जुलैपासून देण्याची घोषणा राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मात्र शेतकऱ्याचा पदरात हा दर उशिराच पडला. अद्यापही काही शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही.

शेतकऱ्याची शेताच्या बांधावर काय अवस्था आहे, हे राज्यातील सत्ताधाऱ्यांना कळत कसे नाही. सरकार जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार असेल तर दूध उत्पादकांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.
प्रभाकर बांगर, पुणे जिल्हा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सरकारकडून दुधाला मिळणारा दर खूप कमी मिळत आहे. सरकारने ३० रुपये दर देऊन तीन महिने उलटले नाही तोच दर २ रुपयांनी कमी करून २ रुपये अनुदानरूपी १ ऑक्टोबरपासून वाढविणार आहे. पण तुमच्या पाच, सात रुपये प्रति लिटर मिळणाऱ्या अनुदानाची कुबडी नको आम्हाला. आमच्या घामाचा दर हवा आहे.
अशोक कोळप, शेतकरी, बेंढारवाडी-पोखरी, ता. आंबेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mosambi Fruit Fall : मोसंबीची निम्मी फळगळ ही वनस्पती शास्त्रीय कारणांनी

Cotton, Soybean Subsidy : कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द; ७/१२ वरील नोंदीवरुनही मिळणार अनुदान

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत गोंधळ, पोटनियम दुरुस्तीचा ठराव मंजूर

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर

Silage Production : यांत्रिक मुरघास निर्मितीतील ‘पेंडगाव आकाश’ कंपनी

SCROLL FOR NEXT