Krushak Samaj Agrowon
ॲग्रो विशेष

Bhavantar Scheme: धान्य खरेदी न करता ‘भावांतर’ द्या

Krushak Samaj Demand: दरवर्षी सरकार वेगवेगळे धान्य खरेदी करते आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. शेतकऱ्यांनाही त्रास दिला जातो, म्हणून ही योजना बंद करावी आणि त्याऐवजी भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फरक देण्यात यावा.

 गोपाल हागे

Akola News: दरवर्षी सरकार वेगवेगळे धान्य खरेदी करते आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. शेतकऱ्यांनाही त्रास दिला जातो, म्हणून ही योजना बंद करावी आणि त्याऐवजी भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फरक देण्यात यावा.

अशी मागणी कृषक समाजातर्फे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण आणि राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. भारत कृषक समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर, उपाध्यक्ष डॉ. रमेश ठाकरे यांनी दिल्ली येथे मंत्र्यांना निवेदन दिले.

शासकीय धान्य खरेदी साठवण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोदाम, बारदाना ही लागतो. तसेच ही योजना बंद केली तर या योजनेसाठी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची पण आवश्यकता भासणार नाही, असेही सुचवले आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, त्यांच्या समस्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचे नियोजन याबाबत डॉ. मानकर व डॉ. ठाकरे यांनी दिल्लीत दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या थांबवण्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले.

संपूर्ण कर्जमाफी, एमएसपीमध्ये वाढ, भावांतर योजना, शेती अवजारे, खते, बियाणे, औषधे इत्यादींवर जीएसटी लावणे थांबवावे किंवा दिलेला जीएसटी शेतकऱ्यांना परत करावा, सरकारने पीकविमा योजना स्वतः चालवावी, रोजगार हमी योजना शेतकऱ्यांच्या शेतात राबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबत मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्याची माहिती डॉ. मानकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT