Farmer Suicides Solution: शाश्‍वत प्रयत्नांतून शेतकरी आत्महत्या रोखणे निश्‍चित शक्य : नितीन गडकरी

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतीतील आत्महत्यांच्या समस्येवर भाष्य करत शाश्वत उपाय आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर जोर दिला. त्यांच्या मते, योग्य बियाणे, सिंचन आणि सेंद्रिय घटकांचा वापर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून आत्महत्या रोखता येईल.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: दर्जेदार बियाणे, सिंचन, तंत्रज्ञान या मूलभूत बाबींची उपलब्धता नसल्याच्या परिणामी विदर्भातील शेतीची अवस्था वाईट झाली. त्यातून नैराश्‍य वाढत अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा या सहा जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या वाढल्या. हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय झाला. यावर एकाचवेळी मात करणे शक्‍य नसले, तरी टप्प्याटप्प्याने प्रयत्न केल्यास शेतकरी आत्महत्या रोखणे शक्य होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केला.

वसंतराव नाईक कृषी तंत्रज्ञान विस्तार संस्था (वनामती) येथे शुक्रवारी (ता. ११) ॲग्रोव्हिजन, महाऑरेंज या संस्थांच्या वतीने संत्रा उत्पादकांसाठी आयोजित कार्यशाळेत गडकरी बोलत होते. कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. डी. एम. पंचभाई, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार चरणसिंग ठाकूर, रवी बोरटकर, केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे डॉ. दिलीप घोष, महाऑरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे यांची या वेळी उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ३२ शेतकऱ्यांनी नुकताच स्पेन दौरा केला होता. या वेळी त्यांनी त्या भागातील संत्रा लागवड, व्यवस्थापन तंत्राची माहिती घेतली. त्या तंत्रज्ञानाविषयी या कार्यशाळेत ऊहापोह करण्यात आला.

Nitin Gadkari
Farmer Issue: आत्महत्या खरंच थांबवायच्या का?

या वेळी गडकरी म्हणाले, ‘‘जागतिकस्तरावर जे-जे चांगले असेल इतकेच काय तर आपल्या शेजारचा शेतकरी जरी चांगले करीत असेल तरी त्याचा अंगीकार केला पाहिजे. पिकांच्या उत्पादकतेत मातीचा कर्ब महत्त्वाचा ठरतो. त्याकरिता सेंद्रिय घटकांचा वापर शेतकऱ्यांनी वाढविला पाहिजे.’’

Nitin Gadkari
Nitin Gadkari: ऊस तोडणी यंत्रांसाठी केंद्रास सुधारित प्रस्ताव पाठवा

शेतीचे उत्पन्न पोहोचेल एक कोटींवर

आमची धापेवाडा शिवारात शेती आहे. यातून एकरी चौदा क्‍विंटल तूर झाली. या सेंद्रिय शेतमालावर गावातीलच दालमिलवर प्रक्रिया केली. त्याचे पॅकिंग करीत भक्‍ती फार्म आणि उत्पादक म्हणून पत्नीचे नाव नोंदविले. त्यातून विश्‍वासार्हतेने ग्राहक खरेदी करतील, असे अपेक्षित होते. एका एकरात ८८ टन ऊस झाला. काही शेतकरी १०० टनांपर्यंत पोहोचले आहेत. या सर्व प्रयोगांतून माझे शेतीचे उत्पन्न कोटींच्या घरात जाईल, असा विश्‍वास श्री. गडकरी यांनी व्यक्‍त केला.

उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी हा विचार शेतीमाल उत्पादकतेत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच संत्र्याच्या चांगल्या रोपांच्या उपलब्धतेसाठी रोपवाटिका कायद्यात सुधारणांची गरज आहे. त्याकरिता एका समितीचे गठण करून या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी होईल. त्याकरिता पाठपुरावा करीत अपेक्षित निर्णय होतील. आधुनिक प्रयोगशाळांसाठी या रोपवाटिकांना अनुदान देण्याबाबतही चाचपणी केली जाईल.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते विकास आणि परिवहन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com