Bhavantar Yojana: शेतकऱ्यांना हवी भावांतर योजना

Farmer Issue: विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेली भावांतर योजनेची आश्वासने सरकार विसरले आहे, असा आरोप शेतकरी करत आहेत. सोयाबीन व कापसाच्या बाजारभावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, हमीभावाच्या तुलनेत त्यांना हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
Bhavantar Yojana
Bhavantar YojanaAgrowon
Published on
Updated on

Amravati News: शेतीमाल विक्रीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना अर्थसाह्य म्हणून भावांतर योजना लागू करण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी केली होती. आता मात्र या सत्ताधाऱ्यांना आश्वासनांचा कर्जमाफीप्रमाणे विसर पडल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोयाबीन व कापसाच्या शेतकऱ्यांचे याही वर्षी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाही भावांतर योजना लागू करण्याची मागणी समोर आली आहे.

Bhavantar Yojana
Cotton Bhavantar : कापसाला भावांतर कसा देता येणार; पणन मंत्र्यांचा विधीमंडळात सवाल

विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा रोष अंगलट येऊ नये, यासाठी सत्ताधारी भाजपने जाहीरनाम्यात कर्जमाफीसह भावांतर योजनेचे आश्वासन दिले होते. तसेच शासकीय खरेदीचेही आश्वासन होते. सोयाबीनची ‘नाफेड’च्या तर कापसाची ‘सीसीआय’च्या माध्यमातून हमीदराने शासकीय खरेदी करण्यात आली.

मात्र या खरेदीचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळू शकला नाही. सोयाबीनच्या नोंदणीदरम्यान तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीच होऊ न शकल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. तर सीसीआयकडील कापसाची खरेदी रखडत झाली. पंधरा दिवस केंद्रांवरील खरेदी बंद राहिली.

Bhavantar Yojana
Onion Bhavantar, MSP : कांद्याला २२५० रुपये हमीभाव द्या; कांद्यासाठी भावांतर योजना राबवा : छगन भुजबळ, रोहीत पवारांची मागणी

शासकीय खरेदीत अडचणी गेल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने त्यांचा शेतीमाल खासगी बाजारात विक्री करावा लागला. यामध्ये हमीदर व बाजार दर यामध्ये मोठी तफावत राहिली आहे. सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे थेट १००० ते १२०० रुपये क्विंटलला नुकसान झाले. तर कापसाला क्विंटलमागे २५० ते ३०० रुपयांचा फटका बसला आहे.

सोयाबीन व कापसाची हेक्टरी उत्पादकता बघता हमीदरही शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. शासकीय खरेदीचा लाभ पूर्णतः मिळालेला नाही. खासगी बाजारात पडत्या दराने शेतमाल विक्री करावा लागला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान अधिक झाले असून कर्ज भरण्याची चिंता आहे. त्यामुळे सरकारने आश्‍वासनानुसार भावांतर योजना लागू करून आधार द्यावा, अशी अपेक्षा आहे.
ज्ञानेश्वर महल्ले, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com