PM Narendra Modi  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : शंभर दिवसांत एक प्रभावी प्रकल्प द्या

Team Agrowon

New Delhi News : केंद्रातील मोदी सरकारने आता तिसऱ्यांदा सत्तेवर येताच पहिल्या शंभर दिवसांमध्ये कामाचा ठसा उमटविण्याचा निर्धार केला असून यासाठी बड्या नोकरशहांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे किमान एक प्रभावी प्रकल्प निश्चित करा आणि त्याची कशापद्धतीने अंमलबजावणी करता येईल? हे देखील सांगा, असे निर्देश या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना धोरणे ठरविताना आणि त्यांची अंमलबजावणी करताना ‘सरकार म्हणून आपण एक आहोत’ असा विचार केला पाहिजे अशी सूचना केली. अल्प कालावधीमध्ये भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे.

प्रत्येक मंत्रालय आणि विभागांनी किमान एका प्रभावी प्रकल्पावर काम करावे, असा आग्रह खुद्द मोदी यांनीच धरला आहे. सर्व मंत्रालये आणि विभागांनी पहिल्या शंभर दिवसांमध्ये प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या घ्यावात आणि वेगाने पावले टाकावीत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सरकार म्हणते

- सरकारी नियम, कायद्यांत सुसूत्रता आणली जावी

- सरकारी संकेतस्थळे अधिक यूजर फ्रेंडली हवीत

- ‘जल जीवन’चा नागरिकांवरील प्रभाव अभ्यासावा

- क्षमता विकासासाठी अधिकाऱ्यांना योग्य मोबदला द्यावा

- सरकारी संगणकीय प्रणालीस योग्य सायबर संरक्षण हवे

‘अर्थसंकल्प लोकांपर्यंत पोचवा’

अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या विविध घोषणांची कालबद्धरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी बजेट वेबिनारचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्व घटकांना सामावून घ्यायला हवे असे सरकारचे म्हणणे आहे.

या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला नेमके किती मनुष्यबळ लागेल? याचा विविध विभाग आणि मंत्रालयांनी आतापासूनच विचार करावा असेही गौबा यांनी सूचित केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT